भारतीय निवडणूक आयोग

महाराष्ट्रातील पंढरपूरसह विविध राज्यांच्या लोकसभा/विधानसभा पोटनिवडणुकांचे वेळापत्रक

Posted On: 16 MAR 2021 7:08PM by PIB Mumbai

 

आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील दोन (2) लोकसभा मतदारसंघातील रिक्त जागा आणि महाराष्ट्रातील पंढरपूर मतदारसंघासह राज्यांमधील विधानसभा मतदारसंघातील चौदा  (14) रिक्त जागा भरण्यासाठी आयोगाने पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अधिक तपशील पुढीलप्रमाणे :

Sl. No.

State

Constituency No. & Name

 

  1.  

Andhra Pradesh

23-Tirupati (SC)

  1.  

Karnataka

2-Belgaum

Sl. No.

State

Constituency No. & Name

 

  1.  

Gujarat

125– MorvaHadaf (ST)

  1.  

Jharkhand

13-Madhupur

  1.  

Karnataka

47-Basavakalyan

  1.  

Karnataka

59–Maski (ST)

  1.  

Madhya Pradesh

55-Damoh

  1.  

Maharashtra

252-Pandharpur

  1.  

Mizoram

26-Serchhip (ST)

  1.  

Nagaland

51-Noksen (ST)

  1.  

Odisha

110-Pipili

  1.  

Rajasthan

179- Sahara

  1.  

Rajasthan

24-Sujangarh (SC)

  1.  

Rajasthan

175-Rajsamand

  1.  

Telangana

87-Nagarjuna Sagar

  1.  

Uttarakhand

49-Salt

 

 

मतदार यादी

1 जानेवारी 2021 अंतिम तारीख मानून उपरोक्त लोकसभा  आणि विधानसभा मतदारसंघांसाठी मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या  आहेत .

 

निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल

Poll Events

Date and Day

Date of Issue of Gazette Notification

23.03.2021

(Tuesday)

Last Date of Nominations

30.03.2021

(Tuesday)

Date for Scrutiny of Nominations

31.03.2021

(Wednesday)

Last Date for Withdrawal of candidatures

03.04.2021

(Saturday)

Date of Poll

17.04.2021

(Saturday)

Date of Counting

02.05.2021

(Sunday)

Date before which election shall be completed

04.05.2021

(Tuesday)

 

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट्स

या पोटनिवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट्स वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट्स पुरेशा संख्येने उपलब्ध करुन देण्यात आले असून या यंत्रांच्या सहाय्याने मतदान सुरळीत पार पडावे  यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली गेली आहेत.

 

मतदारांची  ओळख  पटवणे      

विद्यमान प्रथेनुसार या  निवडणुकीत  मतदानाच्या वेळी मतदारांची ओळख पटवणे अनिवार्य असेल. मतदार फोटो ओळखपत्र (ईपीआयसी) हे मतदार ओळखण्यासाठी मुख्य दस्तावेज  असेल .मात्र  एकही मतदार त्यांच्या मताधिकारांपासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्यासाठी, मतदार यादीत जर  त्याचे नाव असेल तर  खालील पर्यायी ओळखपत्रे देखील चालू शकतील. :

आधार कार्ड,

मनरेगा जॉब कार्ड,

बँक / टपाल कार्यालयाने  दिलेली छायाचित्रे असलेली पासबुक

कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,

वाहन चालक परवाना,

पॅन कार्ड,

एनपीआर अंतर्गत आरजीआयने जारी केलेले स्मार्ट कार्ड,

भारतीय पासपोर्ट,

छायाचित्र असलेले पेन्शन कागदपत्र,

केंद्र / राज्य सरकार / पीएसयू  / सार्वजनिक लिमिटेड कंपन्यांद्वारे कर्मचार्‍यांना देण्यात आलेली  छायाचित्रांसह सेवा ओळखपत्रे आणि

खासदार / विधानसभा सदस्य  / विधानपरिषद सदस्य  यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे

 

आदर्श आचार संहिता

ज्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण किंवा कोणत्याही भागात विधानसभा / लोकसभा निवडणुका  होणार आहेत  अशा ठिकाणी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी त्वरित लागू होईल.   आदर्श आचारसंहिता सर्व उमेदवार, राजकीय पक्ष आणि संबंधित राज्य सरकार यांना लागू असेल. आदर्श आचारसंहिता केंद्र सरकारलाही लागू असेल.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1705225) Visitor Counter : 251


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu