रसायन आणि खते मंत्रालय
केंद्रीय रसायने आणि खत मंत्री 17 मार्च 2021 रोजी करणार इंडिया केम -2021 च्या 11 व्या आवृत्तीचे उद्घाटन
Posted On:
16 MAR 2021 5:54PM by PIB Mumbai
केंद्रीय रसायने आणि खत मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा हे 17 मार्च 2021 रोजी भारत केम -2021 च्या 11 व्या आवृत्तीचे उद्घाटन, बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग (स्वतंत्र प्रभार) आणि रसायने व खत राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत करतील.
इंडिया केम हा आशिया-पॅसिफिक प्रदेशातील रसायन आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रामधील सर्वात मोठा संमिश्र कार्यक्रम आहे. रसायन व पेट्रोकेमिकल्स विभाग आणि फिक्कीच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीत 17 ते 19 मार्च 2021 दरम्यान इंडिया केम -2021 च्या 11 व्या आवृत्तीचे आयोजन करीत आहे.
इंडिया केम -2021 दरम्यान जागतिक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज परिषद, रसायनांच्या वैशिष्ट्यांवर विशेष भर असलेली जागतिक रसायने उद्योग परिषद, जीसीसीच्या सहकार्याने जागतिक पेट्रोकेमिक उद्योग परिषद, जागतिक अग्रोकेमिकल उद्योग परिषद, कॅपिटल गुड्स, प्लांट मशिनरी, पंप्स व व्हॉल्व्हज आणि प्रोसेसेस विषयी परिषदांचे आयोजन केले जाईल.
या क्षेत्रातील द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूकीच्या संधी वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने 19 मार्च 2021 रोजी तीन द्विपक्षीय कार्यक्रम (i) इंडिया-जपान केमिकल अँड पेट्रोकेमिकल फोरम (ii) इंडिया-युरोपियन युनियन केमिकल अँड पेट्रोकेमिकल फोरम आणि (iii) द्विपक्षीय वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने इंडिया-यूएस केमिकल अँड पेट्रोकेमिकल फोरमचे आयोजन केले जाईल.
“इंडिया: ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब फॉर केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स” या संकल्पनेसह इंडिया केम -2021 कार्यक्रम या क्षेत्रात शाश्वत वाढीसाठीच्या जबरदस्त क्षमता आणि सरकारचे पूरक धोरण दर्शवेल आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आणि अन्य हितधारकांना संवाद साधण्याची व एकत्रित येण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल. या भव्य कार्यक्रमामुळे भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून परिवर्तित करण्यासाठी विशेषत: पेट्रोलियम, रसायन आणि पेट्रोकेमिकल गुंतवणूक क्षेत्र (पीसीपीआयआर) मध्ये भारतीय रसायन आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगातील गुंतवणूकीसाठी विशेष प्रयत्न केला जाईल.
Jaydevi PS/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1705187)
Visitor Counter : 230