रेल्वे मंत्रालय

रेल्वे 31 मार्चपासून विशेष रेल्वे सेवा रद्द करणार असल्याचे समाजमाध्यमांवरील वृत्त दिशाभूल करणारे

प्रविष्टि तिथि: 15 MAR 2021 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2021
 

समाजमाध्यमांवरील काही वृत्तांकनात सध्य़ा सुरू असलेल्या विशेष रेल्वे गाड्या रेल्वे 31 मार्च 2021 पासून रद्द करणार असल्याची देण्यात येत असलेली माहिती ही पूर्णपणे दिशाभूल करणारी व निराधार आहे, याची नोंद घ्यावी.

समाजमाध्यमांवर चुकीच्या बातम्यांची चित्रणे फिरत आहेत. सगळ्यांना असे सूचित करण्यात येत आहे की फिरत असणारे हे चित्रण गेल्यावर्षीचे असून आजचे असल्याचे भासवण्यात येत आहे.

भारतीय रेल्वेने अश्या प्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही.

विशेष सेवा म्हणून सध्या सुरू असलेल्या प्रवासी व उपनगरी रेल्वे गाड्या सुरूच राहतील असे कळवण्यात येत आहे. प्रवाश्यांनी प्रवासात कोविड नियमांचे पालन करावे अशी विनंती करण्यात येत आहे.


* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1704976) आगंतुक पटल : 271
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: हिन्दी , Punjabi , Urdu , English , Bengali