श्रम आणि रोजगार मंत्रालय
महिला रोजगार
Posted On:
15 MAR 2021 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2021
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नियमित होणाऱ्या कामगार सर्वेक्षणाच्या (PLFS) 2017-18 व 2018-19 या वर्षांसाठीच्या आकडेवारीच्या हवाल्याने देशात साधारण परिस्थितीत 15 किंवा त्याहून जास्त वर्षे वयाच्या महिलांचा बेरोजगारीचा अंदाजे दर अनुक्रमे 5.6% व 5.1% असल्याचे सांगितले आहे.
भारतातील वेतनपत्र अहवालानुसार : सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने एप्रिल-2020 मध्ये रोजगार दृष्टीक्षेप – डिसेंबर 2020 प्रसिद्ध केला. त्यानुसार एप्रिल-2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजनेत 9.27 लाख महिला सदस्यांची वाढ झाली, नविन निवृत्तीवेतन योजनेत 1.13 लाख कर्मचाऱ्यांची तर राज्य विमा योजनेत 2.03 लाख महिला सभासदांची वाढ झाली
रोजगार निर्मितीला प्रोत्साहन व सामाजिक संरक्षण लाभ त्याचप्रमाणे कोविड-19 महामारी रोजगार गमावलेल्यांना पुन्हा रोजगार मिळवून द्यावा म्हणून सरकारने आत्मनिर्भर भारत रोजगार योजना(ABRY) सुरू केली. ही योजना कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी मार्फत जारी केल्यामुळे MSMEसह इतर विविध क्षेत्रातील व व्यवसायातील रोजगारदात्यावरील आर्थिक ओझे हलके होण्यास मदत झाली तसेच त्यांना जास्त कर्मचारी कामावर ठेवणे शक्य झाले. या योजनेअंतर्गत कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीमध्ये नोंदणीकृत उपक्रमांच्या क्षमतेनुसार भारत सरकार दोन वर्षासाठी कामगाराचा हिस्सा (पगाराच्या 12%), मालकाचा हिस्सा (पगाराच्या 12%) किंवा फक्त कर्मचाऱ्याचा हिस्सा जमा करणार आहे.
कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोष कुमार गंगवार यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
विस्तृत महितीसाठी येथे क्लिक करा
* * *
M.Chopade/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1704901)