आयुष मंत्रालय

सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला 100 दिवसांचा अवधी


आंतरराष्ट्रीय योगदिन 2021 निमित्त पुण्याच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे विविध उपक्रम

प्रविष्टि तिथि: 13 MAR 2021 7:56PM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय योगदिन आता अवघ्या 100 दिवसांवर आला असून, पुण्याच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोसोबत हा योगदिन साजरा करण्यासाठी 100 दिवसांची उलटगणती सुरु केली आहे. या अंतर्गत, दूरदृश्य प्रणालीद्वारे सामान्य योग प्रोटोकॉलसत्रे घेतली जाणार असून ती या संस्थेच्या सोशल मिडीया हँडलवरून प्रसारित केली जाणार आहेत.

आज म्हणजेच, 13 मार्चपासून ही उलट गणती सुरु झाली आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आरओबी चे संचालक प्रकाश मकदूम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, एनआयएनच्या संचालिका प्रा. डॉ सत्य लक्ष्मी यांच्या हस्ते आज याचे आभासी पद्धतीने उद्घाटन झाले. ही सत्रे 21 जून 2021 पर्यंत सकाळी सात ते आठ अशी दररोज एक तास सुरु राहणार आहेत. एनआयएन च्या फेसबुक पेजवर (https://www.facebook.com/punenin) ती उपलब्ध असतील. लोकांमध्ये, विशेषतः आशा आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना सामान्य योग प्रोटोकॉलची माहिती व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने पुणे जिल्हा परिषदेच्या समन्वयाने 22 फेब्रुवारी पासून आशा सेविकांसाठी सामान्य योग प्रोटोकॉल प्रशिक्षण सत्रे सुरु केली आहेत. ही सत्रे मार्च 2021 पर्यंत चालणार असून त्यात 5,000 आशा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या आशा कर्मचारी आपापल्या गावांमध्ये योग प्रशिक्षक म्हणून काम करतील.  या प्रशिक्षणाचा उद्देश कुटुंबातील किमान एका व्यक्तीला सामान्य योग प्रोटोकॉल शिकवणे, आणि त्याद्वारे संपूर्ण गावात 21 जूनला योगाभ्यास केला जाणे, हा आहे. हे उद्दीष्ट घेऊन, 22 फेब्रुवारी पासून आजपर्यंत पुणे जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात एनआयएनच्या डॉक्टर्सनी 1,300 आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले आहेत.

***

S.Thakur/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1704628) आगंतुक पटल : 189
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Urdu , Bengali