सांस्कृतिक मंत्रालय

प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते 4.5 कोटी पानांच्या दस्तऐवजांच्या डिजिटलीकरणाचे उद्‌घाटन

Posted On: 11 MAR 2021 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मार्च 2021

राष्ट्रीय पुराभिलेख विभागाच्या स्थापना दिनानिमित्त, केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते आज साडेचार कोटी पानांच्या ऐतिहासिक दस्तऐवजांच्या डिजिटलीकरणाचे उद्‌घाटन झाले. तसेच, महात्मा गांधी आणि सहकार चळवळ’ या विषयावरील प्रदर्शनाचेही उद्‌घाटन त्यांनी केले. राष्ट्रीय पुराभिलेख विभागाने हे डिजिटलीकरणाचे काम हाती घेतले आहे.

राष्ट्रीय पुराभिलेख विभागाकडे सध्या 18 कोटी पानांचे दुर्मिळ, ऐतिहासिक दस्तऐवज आहेत. यात, राष्ट्रपतींची स्वाक्षरी केलेल्या फाईल्स, खंड, नकाशे, बिल्स, करार, दुर्मिळ हस्तलिखिते, प्राचीन कागदपत्रे, वैयक्तिक कागदपत्रे, नकाशे, चित्रलिपीचे कागद, राजपत्रांचा महत्वाचा संग्रह, लोकसंख्या विषयक नोंदी, संसदीय आणि विधानमंडळातील चर्चा, साहित्य, प्रवासवर्णने इत्यादी विविधांगी दस्तऐवज आहेत.

महात्मा गांधी आणि असहकार चळवळ हे प्रदर्शन देखील मूळ कागदपत्रांवर आधारित असून 15 एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704217) Visitor Counter : 104


Read this release in: English , Urdu , Hindi