संरक्षण मंत्रालय
इंधन सेल आधारित एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी) प्रणालीने वापरकर्ता विशिष्ट चाचण्यांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला
Posted On:
09 MAR 2021 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2021
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) 8 मार्च 2021 रोजी जमीन-आधारित प्रोटोटाइप सिद्ध करून एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी) प्रणालीच्या विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. वापरकर्त्याच्या आवश्यकतेनुसार हे संयंत्र संपूर्ण क्षमतेसह आणि जास्तीत जास्त उर्जा वापरून चालविण्यात आले.
डीआरडीओच्या नौदल साहित्य संशोधन प्रयोगशाळे (एनएमआरएल) द्वारे ही यंत्रणा विकसित केली जात आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या एआयपी प्रणालींचा वापर केला जातो, तर एनएमआरएलची इंधन सेल-आधारित एआयपी ही वैशिष्ठ्यपूर्ण आहे कारण यामध्ये हायड्रोजन तयार होतो .
डीआरडीओने उद्योग भागीदार एल अँड टी आणि थर्मॅक्सच्या सहकार्याने हे तंत्रज्ञान यशस्वीरित्या विकसित केले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीबद्दल डीआरडीओ, भारतीय नौदल आणि उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले.
डीडीआर अँड डी चे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी या कार्यात सहभागी असलेल्या सर्व संस्थाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. भविष्यात देखील डीआरडीओने अशीच कामगिरी करत राहावे असे त्यांनी यावेळी आवाहन केले.
Jaydevi PS/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1703479)
Visitor Counter : 308