सांस्कृतिक मंत्रालय

युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांची केली घोषणा

Posted On: 08 MAR 2021 9:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मार्च 2021

सध्या, भारतामध्ये  तापुरत्या यादीअंतर्गत 42 स्थाने सूचीबद्ध असून जागतिक वारसा स्थळ  म्हणून नाव कोरण्यासाठी ती एक आवश्यक पूर्वअट  आहे. 2019-2020 मध्ये जागतिक वारसा स्थळाच्या नामांकनासाठी ‘धोलवीरा: हडप्पा शहर’ प्रस्ताव पाठवण्यात आला होता. वर्ष  2021-22 साठी  ‘शांतिनिकेतन, भारत’ आणि ‘होईसलाचा पवित्र समूह’ यांचे नामांकन दस्तावेज युनेस्कोकडे  सादर केले गेले आहेत.

जागतिक वारसा यादी / तात्पुरत्या  यादीतील स्थानांमध्ये वाढ करणे ही एक निरंतर  प्रक्रिया आहे आणि  मार्गदर्शक तत्वांतर्गत  निकष पूर्ण करण्याच्या त्यांच्या क्षमतेच्या आधारे आणि उल्लेखनीय जागतिक मूल्य यानुसार स्थानांची निवड केली जाते.

सध्या भारताकडे 38 जागतिक वारसा स्थळे आहेत. एएसआयच्या संवर्धन धोरणानुसार मंत्रालयाच्या अखत्यारीतील सर्व स्थळे संरक्षित आहेत आणि चांगल्या स्थितीत आहेत.

यात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाअंतर्गत महाराष्ट्रातील अजंठा, वेरूळ आणि एलिफंटा लेणी या तीन स्थानांचा समावेश आहे. तर रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसचा समावेश आहे. तर विक्टोरियन अँड  आर्ट डेको ऑनसेम्बल मुंबई महानगर पालिकेद्वारे सांभाळले जाते.   

संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1703337) Visitor Counter : 1706


Read this release in: English , Urdu