विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (एसटीईएम) क्षेत्रात करियर करण्यासाठी सर्व स्तरातील महिलांना जीवनाच्या विविध टप्प्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा कार्यक्रम साहाय्यभूत
प्रविष्टि तिथि:
07 MAR 2021 4:58PM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने:
ईशान्य भारतातील शालेय विद्यार्थ्यांच्या गटाने भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी ) गुवाहाटीला भेट दिली, आणि नासामधील वैज्ञानिकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
विज्ञान ज्योती नावाच्या एका कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि 3 डी प्रिंटिंग, बदलते इलेक्ट्रॉनिक्स, डिझाइन, पॉलिमर, सौर पेशी यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या विविध संधींची ओळख करून देण्यात आली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने ( डीटीएस ) सुरु केलेला हा नवीन कार्यक्रम, तरुण मुलींना विज्ञानामधील रस वाढविण्यासाठी प्रोत्साहित करतो . डिसेंबर 2019 पासून 50 जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये ( जेएनव्ही) हा कार्यक्रम यशस्वीरीत्या सुरु आहे . आणि आता 2021-22.या वर्षासाठी आणखी 50 जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये या कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आला आहे.
अनेक सामाजिक आणि मानसिकतेतील अडथळ्यांमुळे भारतातील विज्ञान , तंत्रज्ञान , अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील महिलांचा सहभाग प्रवेश स्तरापासून ते उच्च पातळीपर्यंत सर्वत्र मर्यादित राहिला आहे. व्यवस्थेतील अडथळे आणि रचनात्मक घटकांमुळे त्यांना शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आव्हानांचाही सामना करावा लागतो.
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी ,तरुण आणि हुशार मुलींना शोधून विज्ञान ज्योती कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये विज्ञानाबदल आवड निर्माण करायला सुरुवात केली आणि महिलांच्या भरभराटीसाठी आव्हानांना न जुमानता वातावरण तयार करणे ही डीटीएस कार्यक्रमाची वचनबद्धता आहे . द जेंडर ऍडव्हान्समेंट फॉर ट्रासनफॉर्मिंग इन्स्टिट्यूशन्स (जीएटीआय )उपक्रम संस्थांमध्ये लिंग समानता आणण्याचा प्रयत्न करीत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि औषध (एसटीईएमएम ) क्षेत्रात महिलांसाठी सर्वसमावेशक आणि संवेदनशील दृष्टीकोन ठेवण्याच्या दृष्टीने परिवर्तन होण्यासाठी संस्थांसाठी जीएटीआय ने मार्गदर्शन सुरु केले आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे विविध यंत्रणांच्या माध्यमातून लिंग समानता आणण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या , महिला विशेष योजना या विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या क्षेत्रात महिलांची कारकीर्द घडविण्यासाठी आणि महिलांना सर्व स्तरावर आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शन करण्यासाठी पाठिंबा देतात.
***
Jaydevi PS/S.Chavhan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1703012)
आगंतुक पटल : 210