आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण दिवस- 50


2.06 कोटींपेक्षा अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 11.64 लाख लोकांना लस देण्यात आली

Posted On: 06 MAR 2021 10:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 मार्च 2021

 

देशभरात आतापर्यंत कोविड-19 लसीची मात्रा घेणाऱ्यांची एकूण संख्या आज 2.06 कोटी इतकी झाली. 

देशभरात कोविड लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021पासून सुरु झाली आणि पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे लसीकरण 2 फेब्रुवारी 2021 पासून सुरु झाले. कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्च 2021 पासून सुरु झाला, या टप्प्यात 60 वर्षे वयावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षे वयावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लास दिली जात आहे.

संध्याकाळी सात वाजेपर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 2,06,62,073 लोकांना लसीची मात्रा देण्यात आली.

यात 69,72,859 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर 35,22,671 आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे. 65,02,869 कोरोनायोध्यांनी पहिली तर 1,97,853 कोरोनायोध्यांनी दुसरी मात्राही घेतली आहे. 60 वर्षे वयापेक्षा अधिक वय असलेल्या 30,05,039 ज्येष्ठ नागरिकांनी आणि सहव्याधी असलेल्या 45 पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे.

HCWs

FLWs

45 to <60 years with Co-morbidities

Over 60 years

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

1st Dose

69,72,859

35,22,671

65,02,869

1,97,853

4,60,782

30,05,039

देशव्यापी लसीकरणाच्या आजच्या 15 व्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत एकूण 11,64,422 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी 9,44,919 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 2,19,503 आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच कोरोना योध्यांना दुसरी मात्रा देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. आजच्या दिवशीचा अंतिम अहवाल रात्री उशिरापर्यंत तयार होईल. 

Date:6thMarch,2021

HCWs

FLWs

45to<60yearswithCo-morbidities

Over60years

Total Achievement

1stDose

2ndDose

1stDose

2nd Dose

1stDose

1stDose

1stDose

2ndDose

57198

165841

146880

53662

114036

626805

944919

219503

 

 

 

 

Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1702943) Visitor Counter : 220


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu