कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

भारतीय फिजिशियन संघटनेच्या 76 व्या वार्षिक परिषदेला मुख्य अतिथी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले संबोधित


‘आत्मनिर्भर भारता’च्या उभारणीत डॉक्टरांच्या योगदानाची डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली प्रशंसा

Posted On: 06 MAR 2021 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 मार्च 2021

 

केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार),पंतप्रधान कार्यालय,कार्मिक,सार्वजनिक  राज्यमंत्री,सार्वजनिक तक्रारी, निवृत्तिवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत डॉक्टरांच्या योगदानाची प्रशंसा केली आणि ते म्हणाले,कोविड महामारीने संकटात संधी निर्माण केली, भारत  फक्त आत्मनिर्भरच होऊ शकत नाही तर इतर देशांनाही विश्वास देऊ शकतो हे, भारतीय वैद्यकीय समुदायाने जगात सिद्ध केले आहे.

महामारीच्या पार्श्वभूमीवर, आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया (एपीआय)चया 76 व्या वार्षिक परिषदेला त्यांनी संबोधित केले.

ज्यांनी कोरोनायोद्ध्ये म्हणून उत्कृष्ट काम केले आणि जेव्हा कमी लोकसंख्या असलेले काही  देश महामारीच्या आव्हाना विरोधात लढत होते,तेव्हा या लढ्यात भारताला सर्व प्रकारच्या आव्हानांवर विजय मिळववून देण्यात मदत करणारे ,युवा डॉक्टर विशेषतः युवा निवासी डॉक्टरांचे डॉ. जितेंद्र सिंग यांनी विशेष कौतुक केले.

एंगेजिंग माइंड्स: एम्पपावरिंग मेडिसिन या एपीआय परिषदेच्या यंदाच्या  संकल्पनेचा संदर्भ देत, डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, ही परिषद ज्यावेळी आयोजित केली  आहे त्या वेळेसाठी ही संकल्पना योग्य आहे.भारतीय डॉक्टरांनी कधी कधी आभासी तर कधी आभासी व्यतिरिक्त इतर माध्यमांद्वारे, शारीरिक व्यस्ततेशिवाय मने गुंतविण्याच्या कलेची  आणि अस्तित्वात असलेल्या विषाणू विरुद्ध लढण्याची शिकवण दिली.

डॉ. एस. एम. सापटणेकर आणि डॉ. वाय. पी. मुंजाळ हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

 

 

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702920) Visitor Counter : 154


Read this release in: English , Urdu , Hindi