ऊर्जा मंत्रालय

ग्रामीण वीजपुरवठ्याचा सरासरी कालावधी 2014-15 मधील 12.5 तासांवरून 2019-20 मध्ये 18.5 तासांपर्यंत वाढला


ऊर्जा मंत्रालय संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन

Posted On: 04 MAR 2021 8:30PM by PIB Mumbai

 

ग्रामीण वीजपुरवठ्याचा सरासरी कालावधी 2014-15 मधील 12.5 तासांवरून 2019-20 मध्ये 18.5 तासांपर्यंत वाढला असल्याची माहिती ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आर. के. सिंह यांनी दिली. काल संध्याकाळी ते नवी दिल्लीत ऊर्जा मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या सदस्यांना संबोधित करत होते. ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आर. के. सिंह यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले.

सन्माननीय खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सिंह यांनी स्पष्ट केले की ऊर्जा मंत्रालयाने अलीकडे हाती घेतलेल्या काही सुधारणात्मक उपक्रमांमध्ये सर्वांसाठी विजेची उपलब्धता, विश्वसनीय, गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत पुरवठा; ग्राहक आणि हरित आणि स्वच्छ राष्ट्राचे सशक्तीकरण यांचा समावेश आहे. निर्धारित वेळेच्या 13 दिवस आधी 100% ग्रामीण विद्युतीकरण पूर्ण झाले आहे तसेच सौभाग्य योजनेंतर्गत 100% घरगुती विद्युतीकरण केले गेले आहे असे त्यांनी नमूद केले. तसेच ग्राहकांच्या सक्षमीकरणासाठी मंत्रालयाने केलेल्या उपायांची माहितीही त्यांनी दिली.

उर्जामंत्री म्हणाले की, वीजेचा तुटवडा असणारा देश वरून अतिरिक्त वीज असणारा देश म्हणून परिवर्तन झाले आहे कारण सध्या 1.89 लाख मेगावॅट सर्वोच्च मागणीच्या तुलनेत देशातील एकूण स्थापित क्षमता 3.77 लाख मेगावॅट आहे. वित्त वर्ष 15-20 मध्ये 1.42 लाख सीकेएम ट्रान्समिशन लाईन आणि 437 एमव्हीए रूपांतर क्षमता वाढवून वन नेशन-वन ग्रिड-वन फ्रिक्वेन्सीचे लक्ष्य साध्य केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

***

S.Tupe/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702560) Visitor Counter : 110


Read this release in: Urdu , Hindi , Punjabi , English