रसायन आणि खते मंत्रालय
जन औषधी दिवस आठवड्याचा चौथा दिवस आज साजरा
'सुविधा से सन्मान' या संकल्पनेवर विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
04 MAR 2021 8:12PM by PIB Mumbai
जन औषधी दिवस सप्ताहाचा चौथा दिवस आज 'सुविधा से सन्मान' या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. बीपीपीआय अर्थात भारतीय औषध सार्वजनिक उपक्रम विभाग, जन औषधी मित्र आणि जन औषधी केंद्र मालक यांच्या पथकाने विविध उपक्रमात भाग घेतला आणि सॅनिटरी पॅड्सच्या वापराबाबत महिलांमध्ये जागृती करण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत सुविधा सॅनिटरी नॅपकिन्स वितरित करण्यासाठी 2000 ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आणि महिलांना 1,00,000 हून अधिक सॅनिटरी नॅपकिन्सची पाकिटे मोफत वाटण्यात आली.
बीपीपीआय अर्थात भारतीय औषध सार्वजनिक उपक्रम विभाग, प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेची कार्यान्वयन संस्था आहे.
तिसरा जन औषधी दिवस 7 मार्च 2021 ला असून एक मार्चपासून जन औषधी दिवस सप्ताह साजरा केला जात आहे. सप्ताहाअंतर्गत आरोग्य शिबिरे, परिसंवाद, टीच देम यंग, सुविधा से सन्मान अशा विविध उपक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या जन औषधी दिवसाची संकल्पना 'सेवाही - रोजगारही ' अशी आहे.
***
S.Tupe/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702551)
Visitor Counter : 143