वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

गुणवत्ताधारक जागरूक देश म्हणून जागतिक पातळीवर भारताची ओळख सुनिश्चित करण्याच्या दिशेने कार्य करण्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आवाहन


भारतीय मानक ब्युरो बीआयएसच्या प्रमाणपत्रांचे सुलभ अनुपालन करण्याच्या कार्यशाळेतील सहभागींना मंत्र्यांचे आभासी पद्धतीने संबोधन

Posted On: 03 MAR 2021 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मार्च 2021

 

वाणिज्य व उद्योग मंत्री, रेल्वे आणि ग्राहक व्यवहार व अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी आज सांगितले की, ज्या देशासोबत लोक खात्रीशीर व्यापार करू शकतात असा गुणवत्ताधारक जागरूक देश म्हणून जागतिक स्तरावर भारताची ओळख सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने आपण कार्य केले पाहिजे. भारतीय मानक ब्युरो बीआयएसच्या प्रमाणपत्रांचे सुलभ अनुपालन करण्याच्या कार्यशाळेच्या समारोप सत्रात ते म्हणाले की गुणवत्ता म्हणजे नफा आणि गुणवत्ता ही अधिकाधिक नफ्यासाठी व्यवसाय तयार करते. गुणवत्तेला स्वतःची ओळख आहे;  गुणवत्ता महाग नाही. ती उत्पादकता वाढवते, व्यवसायांना मोठी बाजारपेठ मिळविण्यास मदत करते जेणेकरुन ते मोठ्या अर्थव्यवस्थेत समाविष्ट होतील आणि अपव्यय टाळण्यात मदत होईल.

आमच्या उद्योग संघटनांच्या माध्यमातून अधिकाधिक सहयोगी प्रयत्नांची जोड देण्याचे आवाहन करताना गोयल म्हणाले की आपण भारतीय मानकांना जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त मानक बनवावे. ते म्हणाले की, भारतीय मानक ब्यूरोने (बीआयएस) गुणवत्ता, एक राष्ट्र एक मानक याद्वारे एकरूपता, आंतरराष्ट्रीय मानसिकता, अनुरुप मूल्यांकन आणि ज्ञान सामायिकरण या ‘क्विक’ मॉडेलवर काम केले पाहिजे. त्वरित कृती, त्वरित प्रतिसाद आणि उत्कृष्ट पद्धतींचा त्वरित अवलंब आणि कार्य करण्याचा वेगवान मार्ग हा आमचा आजचा मंत्र आहे असे ते म्हणाले. मंत्री म्हणाले की, ज्या देशासोबत लोक खात्रीशीर व्यापार करू शकतात असा गुणवत्ताधारक जागरूक देश म्हणून जागतिक स्तरावर भारताची ओळख सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने आपण कार्य केले पाहिजे.

ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय मानक ब्यूरो यांच्यासमवेत उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
 

* * *

S.Tupe/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702311) Visitor Counter : 116


Read this release in: English , Urdu , Hindi