आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

जागतिक श्रवण दिनी डॉ. हर्षवर्धन यांनी एआयआयएसएच, म्हैसूर यांच्यामार्फत श्रवणदोष असलेल्यांसाठी देशभरात उभारण्यात आलेल्या 6 नवीन ‘संपर्क सेवा केंद्रांचे व्हर्चुअल उद्घाटन केले

Posted On: 03 MAR 2021 5:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मार्च 2021


केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज जागतिक श्रवण दिनानिमित्त मैसूर इथल्या  ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग (एआयआयएसएच) ने  देशभरात  श्रवणदोष असलेल्यांसाठी उभारण्यात आलेल्या 6 नवीन ‘ संपर्क सेवा केंद्रांचे व्हर्चुअल  उद्घाटन केले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण  राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यावेळी उपस्थित होते.

नवीन सहा संपर्क  सेवा केंद्रे पुढीलप्रमाणे:

  1. इंदिरा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, पाटणा , बिहार
  2. बिदर वैद्यकीय विज्ञान संस्था , बिदर, कर्नाटक
  3. बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्था, बेळगाव, कर्नाटक
  4. कर्नाटक वैद्यकीय विज्ञान संस्था , हुबळी , कर्नाटक
  5. एम्स, भुवनेश्वर, ओदिशा
  6. श्री देवराज उर्स शिक्षण व संशोधन अकादमी , कोलार, कर्नाटक

डॉ हर्ष वर्धन यांनी आयसीएमआर-एम्सचा अहवाल आणि डीजीएचएस-पीजीआयएमआरची “श्रवणदोष दूर करणे "या विषयावरील एक सचित्र मार्गदर्शक पुस्तिका देखील प्रसिद्ध केली.

DSC_0131.JPG

यावेळी कौतुक व्यक्त करताना डॉ वर्धन यांनी  देशभरात श्रवणदोष असलेल्यांसाठी सहा नवीन ‘संपर्क सेवा केंद्र सुरू केल्याबद्दल एआयएसएचचे अभिनंदन केले. केंद्रीय मंत्री म्हणाले, "अशा प्रकारच्या व्याधी  असलेल्या व्यक्तींची संख्या आणि अशा लोकांच्या गरजा  भागविण्यासाठी व्यावसायिक आणि तज्ञांची कमतरता यामुळे देशातील रुग्णालयांमध्ये संपर्क सेवा केंद्र अर्थात आउटरीच सर्व्हिस सेंटर सुरू करण्याची गरज होती." ते पुढे म्हणाले, "आपण संवाद साधू शकत नसलेल्या व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी  देशातील उपेक्षित  भागात पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे.

DSC_0105.JPG

संवाद दोषावर  नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन  करण्यासाठी लवकर निदान आणि प्रारंभिक टप्प्यात  हस्तक्षेप करण्याची गरज यावर भर  देत केंद्रीय मंत्री म्हणाले, “श्रवणदोषामुळे  मुलांमध्ये वक्तृत्व आणि  भाषेचा विकास होऊ शकत नाही . यामुळे त्यांच्या एकूणच संवाद संबंधी  विकासावर परिणाम होऊ शकतो. मात्र, जर या गोष्टी लवकर लक्षात आल्या तर या विकाराचे नकारात्मक परिणाम कमी होतील.”

DSC_0071.JPG

सुरुवातीची लक्षणे आणि सर्वसामान्यांमध्ये उपचारांबद्दल जागरुकतेचा अभाव  याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त  केली.

आवाजामुळे निर्माण झालेल्या श्रवणदोष बाबत बोलताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, “हा संवेदनशील विषय आहे आणि आपण यावर काम केले पाहिजे. जे रात्री दहाच्या पुढे कर्कश आवाजाचा आणि ध्वनीचा  विरोध करतात त्यांना या सततच्या आवाजामुळे प्रत्येकाच्या कानाच्या आरोग्यावर होणाऱ्या गंभीर धोक्याची माहिती असते. ”


* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1702265) Visitor Counter : 288


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi