नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
नवीकरणीय ऊर्जा सहकार्यासंदर्भात भारत आणि फ्रान्समधील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
Posted On:
03 MAR 2021 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीकरणीय ऊर्जा सहकार्य क्षेत्रातील भारत आणि फ्रान्समधील सामंजस्य कराराला आज मंजूरी दिली. जानेवारी 2021 मध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.
परस्पर लाभ, समानता आणि परस्परसंवादाच्या आधारे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन देणे हे या सामंजस्य कराराचे उद्दीष्ट आहे. यात सौर, पवन, हायड्रोजन आणि बायोमास उर्जेशी संबंधित तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
संजस्य करारात खालील मुद्यांचा समावेश आहे:
- वैज्ञानिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची देवाणघेवाण आणि प्रशिक्षण;
- वैज्ञानिक आणि तांत्रिक माहिती आणि डेटाची देवाणघेवाण;
- कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन; उपकरण, माहिती आणि तंत्रज्ञान यांचे हस्तांतरण;
- संयुक्त संशोधन आणि तंत्रज्ञान प्रकल्पांचा विकास.
हा सामंजस्य करार नवीकरणीय उर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या विकासाला सहाय्य करेल आणि त्याद्वारे वर्ष 2030 पर्यंत 450 गीगावॅट नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य प्राप्त करण्याच्या प्रक्रियेस मदत करेल.
* * *
M.Chopade/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702188)
Visitor Counter : 170