भूविज्ञान मंत्रालय

यंदा फेब्रुवारी मध्ये वर्ष 1901 नंतर संपूर्ण भारतात सहाव्या क्रमाकांच्या सर्वात कमी पावसाची नोंद

Posted On: 03 MAR 2021 12:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मार्च 2021


2021 च्या संपूर्ण हिवाळ्यामध्ये देशातील वास्तविक सरासरी कमाल, सरासरी किमान आणि सरासरी तापमान अनुक्रमे 27.47 अंश सेल्सियस, 15.39 अंश सेल्सियस आणि 21.43 अंश सेल्सियस होते.

1981-2010 या कालावधीतील हे आकडे आधारित 26.70 अंश सेल्सियस, 14.59 अंश सेल्सियस आणि 20.65 अंश सेल्सियस असे होते. अशाप्रकारे देशातील सरासरी कमाल, सरासरी किमान आणि सरासरी तापमान अनुक्रमे 0.77 अंश सेल्सियस, 0.80 अंश सेल्सियस आणि 0.78 अंश सेल्सियसपेक्षा जास्त होते. 1981 ते 2010 या कालावधीतील हवामानविषयक डेटा सामान्य असल्यामुळे विसंगती गणना करण्यासाठी वापरला जातो (2021 मधील वास्तविक सरासरी तपमान हे 1981-2010 च्या डेटावर आधारित आहे). आकृती 1 मध्ये 1971-1021 दरम्यान संपूर्ण भारतातील मौसमी सरासरी कमाल, सरासरी किमान आणि सरासरी तापमानाची वेळ मालिका दर्शविली  आहे.

मुसळधार पावसाची वारंवारता फेब्रुवारी 2021 मध्ये दक्षिण द्वीपकल्पातील काही भागात मुसळधार पाऊस झाला.

ग्राफिक आणि इतर तपशिलांसाठी येथे क्लिक करा:

कृपया स्थान विशिष्ट अंदाज आणि इशाऱ्यासाठी मौसम अॅप, अ‍ॅग्रोमेट अ‍ॅडव्हायझरीसाठी मेघदूत अ‍ॅप आणि विजांच्या इशाऱ्यासाठी दामिनी अॅप डाउनलोड करा


* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1702148) Visitor Counter : 246


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi