वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

उद्योग मंथन: भारतीय उद्योगांची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यावर भर देणाऱ्या वेबिनारची मालिका संपन्न (4 जानेवारी - 2 मार्च 2021)

Posted On: 02 MAR 2021 11:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2021

 

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून उत्पादने जागतिक निकषांची पूर्तता करतात हे सुनिश्चित करण्यासाठी भारतीय उत्पादक आणि इतर उद्योग नेत्यांना आवाहन केले.

त्यांच्या या दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील 46 प्रमुख क्षेत्रांची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यावर भर देणाऱ्या वेबिनारची मालिका 4 जानेवारी, 2021 रोजी सुरू झाली. उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग, डीओसी, क्यूसीआय, एनपीसी, बीआयएस, इंडस्ट्री चेंबर्स आणि सर्व संबंधित मंत्रालयांच्या सहकार्याने या वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले.

गेल्या आठ आठवड्यांत, जीडीपीच्या जवळपास 70% क्षेत्रावरील विविध उत्पादन व सेवा क्षेत्रातील 46 सत्रे घेण्यात आली असून त्यात ऑटोमोबाईल, स्टील, फार्मा, संरक्षण, सिमेंट, वस्त्रोद्योग, रसायने, पर्यटन / आतिथ्य, वित्तीय सेवा, जैव तंत्रज्ञान, नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा यांचा समावेश होत. इतर विविध माध्यम मंचावर 393 वक्ते आणि 17,000 हून अधिक दर्शक आणि अंदाजे 6.5 दशलक्ष पेक्षा अधिक लोकांची समाज माध्यमांवरील उपस्थिती याद्वारे या मंथन मालिकेला उदंड प्रतिसाद मिळाला. उत्पादनांच्या गुणवत्तेशी संबंधित घटक आणि उद्योगाची उत्पादकता विषयक बाबींवर  विशिष्ट वेबिनारमध्ये चर्चा झाली.

 

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702074) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Hindi