अर्थ मंत्रालय

केंद्रीय महसूल नियंत्रण प्रयोगशाळेला जागतिक सीमाशुल्क संघटनेची प्रादेशिक सीमाशुल्क प्रयोगशाळा (आरसीएल) म्हणून मान्यता

Posted On: 02 MAR 2021 9:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2021

 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाच्या अंतर्गत असलेल्या नवी दिल्लीतील केंद्रीय महसूल नियंत्रण प्रयोगशाळेला (सीआरसीएल),आज आशिया-पॅसिफिक क्षेत्रासाठी जागतिक सीमाशुल्क संघटनेची (डब्ल्यूसीओ) प्रादेशिक सीमाशुल्क प्रयोगशाळा (आरसीएल) म्हणून मान्यता मिळाली. आभासी स्वाक्षरी समारंभात डब्ल्यूसीओचे महासचिव कुनिओ मिकुरिया आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष एम. अजित कुमार यांनी या मंडळांच्या वतीने सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली.

आरसीएल म्हणून मान्यता मिळाल्यामुळे सीआरसीएल जपान आणि कोरियासारख्या क्षेत्रातील सीमाशुल्क प्रयोगशाळांच्या निवडक गटामध्ये सामील झाली आहे. यावेळी महासचिव कुनिओ मिकुरिया यांनी हा बदल साध्य करण्यासाठी भारतीय सीमाशुल्क प्रशासन आणि सीआरसीएलचे कौतुक केले.

 

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1702067) Visitor Counter : 248


Read this release in: English , Urdu , Hindi