विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
तीन दिवसीय ग्लोबल बायो इंडिया 2021 चे केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते उद्घाटन
विशेष अतिथी श्रीमती निर्मला सीतारामन यांनी उद्घाटन सत्राला केले संबोधित
सरकारच्या पाठिंब्याने विविध योजना आणि धोरणांच्या माध्यमातून भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्था नेहमीच एक सर्जनशील आणि विकसित क्षेत्र राहिले आहे- डॉ. हर्ष वर्धन यांचे ठाम प्रतिपादन
Posted On:
01 MAR 2021 10:37PM by PIB Mumbai
नवी दिल्लीत आयोजित ग्लोबल बायो-इंडिया -2021 च्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज आभासी माध्यमाद्वारे केले. या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील आणि वैश्विक समुदायामधील भारताच्या जैव तंत्रज्ञान क्षेत्राचे सामर्थ्य आणि संधी यांचे दर्शन घडेल.1 मार्च ते 3 मार्च 2021 या कालावधीत आयोजित या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन डिजिटल मंचावर करण्यात आले आहे. "जैव विज्ञान ते जैव-अर्थव्यवस्था" या घोषवाक्यासह "जीवनात परिवर्तन" ही यावर्षीची संकल्पना आहे.

जैव तंत्रज्ञान विभाग, भारत सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयासह त्यांचे सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहायता परिषद (बीआयआरएसी) यांच्या एकत्रित सहकार्यातून भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय), असोसिएशन ऑफ बायो टेक्नॉलॉजी लेड इंटरप्राईझेस (एबीएलई) आणि इन्व्हेस्ट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जैव तंत्रज्ञानातील सर्वात मोठ्या भागीदारांपैकी एक ग्लोबल बायो इंडियाने या कार्यक्रमाचे सह आयोजन केले आहे.

डॉ. हर्ष वर्धन यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात माहिती देताना सांगितले की, सरकारच्या पाठिंब्याने विविध योजना आणि धोरणांच्या माध्यमातून भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्था नेहमीच एक सर्जनशील आणि विकसित क्षेत्र राहिले आहे. "तथापि, गेल्या वर्षी कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, सरकार आणि खाजगी क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नांतून या क्षेत्राचे खरे सामर्थ्य, लवचिकपणा आणि क्षमता समोर आली आहे, असे मंत्री म्हणाले. कोविड 19 या जागतिक आरोग्य संकटावर मात करण्याच्या दृष्टीने रोगनिदान कौशल्य विकास, लसी, मोनोक्लोनल्स, नवी संरक्षण उपकरणे, स्टार्टअप्सना पाठिंबा, निदान क्षमता वाढविणे आणि वेगवान नियंत्रित प्रतिसाद या द्वारे "जैव तंत्रज्ञान विभागाच्या (डीबीटी) संशोधन विभाग (डीएचआर), डीएसटी, आयसीएमआर, सीएसआयआर या स्वायत्त संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांच्या माध्यमातून सरकार अविरत प्रयत्न करीत आहेत.

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाल्या. जैव तंत्रज्ञानाच्या संवर्धनासाठी जैवतंत्रज्ञान विभाग करीत असलेल्या अथक प्रयत्नांची अर्थमंत्र्यांनी प्रशंसा केली. त्या म्हणाल्या की, जैव अर्थव्यवस्था 70 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतक्या प्रमाणात वाढली, हे स्पष्ट आहे. कोविड 19 महामारीवर मात करण्यासाठी कोविड 19 रोगनिदान कौशल्य, लसी आणि इतर उपाय अभूतपूर्व कालावधीत उपलब्ध करण्यात बजावलेल्या भूमिकेबद्दल श्रीमती सीतारामन यांनी जैव तंत्रज्ञान क्षेत्राचे कौतुक केले.

डॉ. हर्ष वर्धन यांनी “राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान धोरणा"चे अनावरण केले आणि ग्लोबल बायो-इंडियाच्या आभासी प्रदर्शनाचे उद्घाटनही केले.
***
S.Tupe/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701826)