अर्थ मंत्रालय

2020-21 या आर्थिक वर्षासाठी जानेवारी महिन्यापर्यंत भारत सरकारच्या खात्यांचा मासिक आढावा

Posted On: 26 FEB 2021 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2021

भारताच्या केंद्र सरकारचे जानेवारी 2021 चे मासिक खाते एकीकृत करण्यात आले आहे आणि त्याचे अहवाल प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

त्याची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत:-

भारत सरकारला जानेवारी 2021 पर्यंत 12,83,314 कोटी रुपये( 2020-21च्या सुधारित अंदाजानुसार एकूण प्राप्तीच्या 80%) प्राप्त झाले आहेत त्यामध्ये 11,01,855 कोटी रुपये कर महसूल( केंद्राकडे निव्वळ), 1,41,104 कोटी रुपये बिगर कर महसूल आणि 40,355 कोटी रुपये बिगर कर्ज भांडवली प्राप्तीचा समावेश आहे. बिगर कर्ज भांडवली प्राप्तीमध्ये 15,804 कोटी रुपये कर्जवसुली आणि निर्गुंतवणूक प्रक्रियेतून मिळालेल्या 24,551 कोटी रुपयांचा समावेश आहे.

भारत सरकारकडून जानेवारी 2021 पर्यंत राज्य सरकारांना कराच्या वाट्याच्या हस्तांतरणापोटी 4,08,873 कोटी रुपये देण्यात आले आहेत. भारत सरकारकडून झालेला एकूण खर्च 25,17,318 कोटी रुपये( 2020-21 या वर्षाच्या सुधारित अंदाजाच्या 73% ) असून त्यामध्ये महसुली खात्यावरील 21,55,210 कोटी रुपये आणि भांडवली खात्यावरील 3,62,108 कोटी रुपयांचा समावेश आहे. एकूण महसुली खर्चापैकी 5,19,597 कोटी रुपये व्याज चुकाऱ्यांवर आणि 2,52,656 कोटी रुपये प्रमुख अनुदानावर खर्च झाले आहेत.       

 

Jaydevi PS/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701236) Visitor Counter : 91


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi