विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रात सहकार्याबाबत भारत आणि ब्राझीलच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांमध्ये चर्चा
Posted On:
25 FEB 2021 6:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2021
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी 24 फेब्रुवारी 2021 रोजी स्वागत केलेल्या ब्राझीलचे विज्ञान- तंत्रज्ञान आणि नवोन्मेष मंत्री मार्कोस सीझर पॉन्टेस यांच्या नेतृत्वातील उच्च-स्तरीय शिष्टमंडळाबरोबर ब्रिक्स सारख्या विविध द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्याबरोबरच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यापक मुद्द्यांवर चर्चा केली.
भारत-ब्राझील सहकार्याने आरोग्य, औषधे आणि कोविड -19 प्रतिबंधक लस, औषधे आणि लस, जैव तंत्रज्ञान, ऊर्जा, नॅनो तंत्रज्ञान, आयसीटी, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायबर सुरक्षा; बायोम्स (वनस्पती आणि प्राणी) आणि कृषी, महासागर, पाण्याची गुणवत्ता, हवेची गुणवत्ता आणि वातावरणीय प्रदूषण यांचे उपग्रहाद्वारे निरीक्षण; हवामान अंदाज आणि हवामान बदलांसाठी पृथ्वी प्रणाली प्रारूपाचा (अर्थ सिस्टीम मॉडेलिंग) विकास करणे यासारख्या विषयांवर साधक बाधक चर्चेचा भर होता.
2021 मध्ये ब्रिक्सचे अध्यक्ष म्हणून भारत वैज्ञानिक घटनांची मालिका चालवेल आणि समन्वय साधेल अशी माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी आपल्या समपदस्थांना दिली.
डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, “व्हॅक्सीन मैत्री’ यंत्रणेत अत्यधिक जोखीम असणार्या लोकांना परवडणाऱ्या दरात सुरक्षित आणि प्रभावी कोविड -19 प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देणे प्रस्तावित आहे. हितधारक राष्ट्रांना लसींचा पुरवठा करण्यास भारत वचनबद्ध आहे.
या बैठकीत विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील उभय देशांमधील सुरू असलेल्या सहकार्यास उभय देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही बाजूंनी मान्यता देण्यात आली.
* * *
S.Thakur/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700872)
Visitor Counter : 300