संरक्षण मंत्रालय
रिअर ऍडमिरल अजय कोचर यांनी नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लीट कमांड म्हणून पदभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
24 FEB 2021 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2021
रिअर ऍडमिरल अजय कोचर, एनएम यांनी 24 फेब्रुवारी 21 रोजी विमानवाहू नौका आयएनएस विक्रमादित्यवर झालेल्या औपचारिक समारंभात रिअर ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन, एव्हीएसएम, व्हीएसएम यांच्याकडून नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग फ्लीट (एफओसीडब्ल्यूएफ) म्हणून पदभार स्वीकारला.
तोफखाना व्यवस्थापन आणि क्षेपणास्त्र युद्ध क्षेत्रात पारंगत असणारे रिअर ऍडमिरल अजय कोचर हे 1 जुलै 1988 रोजी नौदलात रुजू झाले. 32 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी आय.एन.एस. विक्रमादित्य या विमानवाहु नौकेसह पश्चिम आणि पूर्व अशा दोन्ही समुद्री किनाऱ्यावर पाच युद्धनौकाचे नेतृत्व केले. फ्लॅग रँकच्या पदोन्नती नंतर त्यांनी कॅरिअर प्रोजेक्ट्सचे सहाय्यक नियंत्रक आणि युद्धनौकाचे उत्पादन व खरेदी सहाय्यक नियंत्रक म्हणून काम केले.
I41I.jpeg)
Jaydevi PS/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1700615)
आगंतुक पटल : 274