संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदलासाठीच्या आठ क्षेपणास्त्रासह दारुगोळा बार्ज अधिग्रहणासाठी मेसर्स सीकॉन यांच्यासोबत विशाखापट्टणम इथे करारावर स्वाक्षरी

प्रविष्टि तिथि: 24 FEB 2021 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2021

भारतीय नौदलासाठीच्या आठ क्षेपणास्त्रासह दारुगोळा बार्जच्या ( एमसीए) अधिग्रहणासाठी  विशाखापट्टणम इथे 19 फेब्रुवारी , 2021 रोजी मेसर्स सीकॉन सोबत करार झाला. 22 जुलै पासून या बार्ज नौदलाच्या सेवेत दाखल  होणार आहेत . क्षेपणास्त्र ,तोफखाना व्यवस्थापन आणि एएसडब्ल्यू दारुगोळा जहाजात चढविणे आणि उतरविण्याच्या  मोहिमेअंतर्गत हे क्षेपणास्त्रासह दारुगोळा बार्ज भारतीय नौदलात समाविष्ट केले जातील. या प्रकल्पामुळे भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमात आणखी एक मैलाचा दगड जोडला गेला आहे.

 

 

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1700608) आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी