विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

'जायफळ फलावरण टॉफी उत्पादन प्रक्रिया' मधील तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणासाठी, आयसीएआर - सीसीएआरआय गोवा आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळ, गोवा यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी

Posted On: 24 FEB 2021 7:17PM by PIB Mumbai

पणजी, 24 फेब्रुवारी 2021

जायफळ फलावरण टॉफी उत्पादन प्रक्रिया' मधील आयसीएआर -सीसीएआरआयच्या  तंत्रज्ञानाच्या  व्यावसायिकीकरणासाठी, आयसीएआर -केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था (आयसीएआर - सीसीएआरआय) गोवा आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळ, गोवा यांनी 19 फेब्रुवारी, 2021 रोजी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या सामंजस्य करारावर आयसीएआर - सीसीएआरआय चे संचालक ( ए) डॉ.ई. बी. चाकुरकर आणि जीएसबीबी - गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ.प्रदीप सरमोकदम यांनी स्वाक्षरी केली.

हे तंत्रज्ञान विकसित करण्यात सहभाग असलेले प्रधान संशोधक ( फलोत्पादन ) डॉ. ए .आर. देसाई ,गोवा राज्य जैवविविधता मंडळ, गोवा इथले अधिकारी, आयसीएआर-सीसीएआरआय, गोवा इथले कर्मचारी सदस्य यावेळी उपस्थित होते. ( आयटीएमयू) चे सदस्य सचिव डॉ.श्रीपाद भट यांनी आयसीएआर - सीसीएआरआय आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळातील सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी वैध असलेल्या मुक्त परवाना कराराची ठळक वैशिष्ट्ये सादर केली.

सामंजस्य कराराबद्दल डॉ. ई. बी. चाकुरकर यांनी गोवा राज्य जैवविविधता मंडळ, गोवा यांचे अभिनंदन केले आणि गोवा राज्यातील शेतकरी तसेच कृषी उद्योजकांच्या फायद्यासाठी व्यावसायिक उपयोग आणि अपेक्षित  तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. डॉ. प्रदीप सरमोकदम यांनी आयसीएआर-सीसीएआरआय ,गोवा यांचे आभार मानले. आणि राज्यातील  जैविक स्त्रोतांच्या शाश्वत वापराद्वारे जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी ,गोवा राज्य जैवविविधता मंडळ आयसीएआर-सीसीएआरआय सह सतत सहकार्यात्मक काम करू इच्छिते, असे त्यांनी सांगितले.ग्रामस्थांचे उत्पन्न वाढविण्यासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि स्थानिक जैविक स्त्रोतांच्या संवर्धनासाठी, गोवा राज्य जैवविवीधता मंडळ,गोवा यांनी "उपजीविकेच्या साधनाद्वारे जैवविविधतेच्या संवर्धनासाठी ' गो वन' (GoVan) या  ब्रँड" नावाने नवीन प्रकल्प सुरू केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

जायफळ या फळामध्ये सुमारे 80 ते 85 टक्के फलावरण (जायफळ फळाचे बाह्य आवरण) असते आणि जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या जायफळाच्या जाती प्रति झाड 100 किलो ताजे फलावरण तयार करते. जायफळ बियाणी आणि जायपत्री संकलित करणे आणि  सामान्यतः कुजण्यासाठी शेतात फलावरण टाकणे ही सध्याची पद्धती आहे. मात्र हे तंत्रज्ञान फलावरणाच्या प्रभावी वापरासाठी साहाय्यकारी ठरेल, नाहीतर ते टाकून दिले जाते. जायफळ टॉफी तयार करणे म्हणजे मूल्यवर्धित अन्न उत्पादनाची व्यावसायिकदृष्ट्या शक्य अशी पद्धत आहे.  जायफळ मसाला उत्पादने, जायफळ बिया आणि जायपत्री यांच्याशिवाय शेतकरी आणि उद्योजकांना मिळणारे हे अतिरिक्त उत्पादन आहे. कोणत्याही कृत्रिम परिरक्षकाशिवाय साध्या वेष्टनात खोलीमधील तापमानात हे उत्पादन  चांगले टिकून राहाते. आयसीएआर-सीसीएआरआय, गोवा यांनी या तंत्रज्ञानाच्या पेटंटसाठी यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. (अर्ज क्र.: 201621012414) पुढील वाणिज्यकरणासाठी तंत्रज्ञान व्यवस्थापन विभागाने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

 

S.Thakur/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1700546) Visitor Counter : 116


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil