सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
विजय सांपला यांनी आज राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला
Posted On:
24 FEB 2021 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वसंत पंचमी विजय सांपला यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर, केंद्रीय मंत्री सोम प्रकाश, एनसीएससी चे माजी अध्यक्ष, भाजपा खासदार हंस राज हंस आणि आयोगाचे अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. विजय सांपला यांनी 2014-19 दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय व आणि सक्षमीकरण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001OHGC.jpg)
कार्यभार स्वीकारल्यानंतर विजय सांपला यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की ते अनुसूचित जाती समुदायाच्या हितांचे व हक्कांचे रक्षण करण्यासाठी अविरत काम करतील. सांपला म्हणाले की, आयोग केवळ अनुसूचित जातींना न्याय मिळवून देण्यासाठीच काम करणार नाही तर समाजावर होणाऱ्या कोणत्याही प्रकारचा अन्याय रोखण्यासाठी क्रियाशील राहील. अधिक माहिती देताना ते म्हणाले की, आयोग अनुसूचित जातींच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी तसेच त्यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी नियोजन प्रक्रियेत सहभागी होईल आणि सल्लाही देईल.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002X2M7.jpg)
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003UH8K.jpg)
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700531)
Visitor Counter : 204