उपराष्ट्रपती कार्यालय
संसद आणि विधिमंडळातील महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
आरक्षण देण्याबाबत सर्व राजकीय पक्षांनी सहमती दाखवण्याची उपराष्ट्रापतींची विनंती
सामाजिक कार्यकर्ते आणि माजी आमदार ईश्वरी बाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टपाल तिकीट केले जारी
ईश्वरीबाई यांना वाहिली आदरांजली
Posted On:
23 FEB 2021 9:05PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज संसद आणि विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याचे आणि सर्व राजकीय पक्षांना महिलांना आरक्षण देण्याबाबत एकमत होण्याचे आवाहन केले.
शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक आणि माजी आमदार दिवंगत ईश्वरीबाई यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन करून उपराष्ट्रपतींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ईश्वरीबाई यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात केलेले योगदान खरोखरच कौतुकास्पद आहे आणि त्यांनी लोकांच्या मनावर खोलवर छाप पाडली आहे असे ते यावेळी म्हणाले.
विरोधी पक्षनेते म्हणून ईश्वरीबाई या लोकांचा आवाज होत्या. त्यांनी सतत मुले, स्वयंसेवी संस्था, शिक्षक, शेतमजूर आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या प्रश्नांना वाचा फोडली.
नायडू म्हणाले की, 17 व्या लोकसभेत सर्वाधिक 78 महिला सभासद आहेत, पण एकूण सभासदांपैकी त्यांचे प्रमाण केवळ 14% आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या आरक्षणामुळे देशातील लाखो महिलांना राजकीयदृष्ट्या अधिक सक्षम केले आहे याकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की संसद आणि विधानसभांमध्ये देखील महिलांना आरक्षण देण्याबाबत तातडीने लक्ष घातले पाहिजे आणि यासाठी सर्व राजकीय पक्षांची सहमती आवश्यक आहे.
देशाची सुरक्षा, भ्रष्टाचार निर्मूलन आणि सामाजिक न्यायाची खात्री यासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यांवर सर्व राजकीय पक्षांनी सहमतीने दृष्टीकोन स्वीकारण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले.
निकोप लोकशाहीसाठी सरकारने आणि विरोधी पक्षांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे असे नायडू म्हणाले.
यावेळी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महूद अली, ईश्वरी बाई मेमोरियल ट्रस्टच्या अध्यक्ष गीता रेड्डी व इतर मान्यवर उपस्थित होते.
उपराष्ट्रपतींच्या संपूर्ण भाषणासाठी येथे क्लिक करा
Jaydevi PS/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700294)
Visitor Counter : 188