संरक्षण मंत्रालय
महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग म्हणून रिअर ऍडमिरल अतुल आनंद, व्हीएसएम यांनी स्वीकारला पदभार
Posted On:
22 FEB 2021 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2021
रिअर ऍडमिरल अतुल आनंद व्हीएसएम यांनी 22 फेब्रुवारी 2021 ला महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग म्हणून पदभार स्वीकारला. आयएनएस कुंजाली वर झालेल्या या कार्यक्रमात रिअर ऍडमिरल अतुल आनंद यांना मानवंदना देण्यात आली. भारतीय नौदलाच्या एक्झिक्युटिव्ह विभागात 1 जानेवारी 1988 ला ते रुजू झाले.

खडकवासला इथली राष्ट्रीय संरक्षण अकादमी,बांगलादेशमधल्या मीरपूर इथले डिफेन्स सर्विस कमांड अँन्ड स्टाफ कॉलेज,नवी दिल्लीचे राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत. अमेरिकेच्या हवाई इथल्या आशिया पॅसिफिक केंद्रावरचा प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या एडव्हान्स सिक्युरिटी स्टडी कोर्समधेही ते सहभागी झाले. अतुल आनंद हे एम फिल,एम एससी ( संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास ), मास्टर इन डिफेन्स स्टडीज आणि बी एससी पदवीधारक आहेत.
* * *
M.Iyengar/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699982)
Visitor Counter : 173