रेल्वे मंत्रालय
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ‘रेल-रोको’ आंदोलनाचा रेल्वेसेवेवर नगण्य परिणाम
Posted On:
19 FEB 2021 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2021
काही शेतकरी संघटनांनी 18 फेब्रुवारी 2021 रोजी पुकारलेल्या देशव्यापी 'रेल-रोको' आंदोलनाचा रेल्वेवाहतुकीवर अत्यल्प परिणाम जाणवला. एकूण 12800 (यात प्रवासी आणि मालगाड्यांचाही समावेश) रेल्वेगाडयांपैकी 30 प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर या आंदोलनाचा परिणाम जाणवला. इतर सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेनुसार निर्धारित स्थानी पोहचल्या असून अद्याप निर्धारित स्थानकांवर न पोहचलेल्या इतर लांब पल्याच्या गाड्याही निर्धारित वेळीच पोचण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रात, मुंबईतल्या उपनागरी गाड्यांच्या वाहतुकीवर या रेल रोकोचा काहीही परिणाम जाणवला नाही. तसेच, मालगाड्या आणि मालवाहतुकीच्या महासूलावरही याचा परिणाम झालेला दिसला नाही.
कुठलाही अनुचित प्रकार अथवा घटना न होता, हे रेल-रोको आंदोलन पार पडले आंदोलनानंतर रेल्वेच्या सर्व क्षेत्रीय भागातील वाहतूक सुरळीत सुरु होती. बहुतांश क्षेत्रांमधून आंदोलकांनी गाड्या थांबवल्याच्या एकाही घटनेचे वृत्त आले नाही.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699494)
Visitor Counter : 142