श्रम आणि रोजगार मंत्रालय

कर्मचारी राज्य विमा महामंडळ इ.एस.आय.सी. च्या लाभार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून 10 कि.मी.च्या परिघामध्ये इ.एस.आय.सी. रुग्णालय किंवा दवाखान्याची सुविधा न मिळाल्यास जवळपासच्या ई.एस.आय.सी. प्रविष्ट रूग्णालयांद्वारे वैद्यकीय सेवा मिळणार

Posted On: 18 FEB 2021 7:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2021

नवीन भौगोलिक क्षेत्रात ईएसआय योजनेचा विस्तार झाल्यानंतर ईएसआय लाभार्थ्यांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ लक्षात घेऊन, लाभार्थ्यांच्या निवासस्थानाच्या जवळपास चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी ईएसआय वैद्यकीय सेवा पायाभूत सुविधांना बळकटी देण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत.

इ.एस.आय.सी. च्या लाभार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून 10 कि.मी.च्या परिघामध्ये इ.एस.आय.सी. वैद्यकीय सेवा पायाभूत सुविधा म्हणजे इ.एस.आय.सी. रुग्णालय, दवाखाना किंवा इन्शुअर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर (आयएमपी) उपलब्ध नसल्यास  वैद्यकीय सेवा मिळविण्यातील त्रास कमी करण्यासाठी, आता ईएसआय दवाखाना किंवा रुग्णालयाकडून कोणत्याही रेफरल शिवाय जवळच्या ईएसआयसी प्रविष्ट रुग्णालयाकडून (देशभरातील) वैद्यकीय सेवा आता हे लाभार्थी घेऊ शकतात.

अशा भागात वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी, अशा भागातील ईएसआय लाभार्थी ईएसआय ई-पहचान कार्ड/ आधारसह आरोग्य पासबुक/ सरकारतर्फे दिलेले ओळखपत्र जवळ बाळगून ईएसआय प्रविष्ट रुग्णालयात जाऊन अशा रूग्णालयातून ओपीडी सेवांसाठी कॅशलेस वैद्यकीय सल्ला घेऊ शकतात. असे लाभार्थी ओपीडी सल्ल्यानुसार औषधांच्या खरेदीसाठी खर्च केलेल्या रकमेची भरपाई जवळच्या दवाखाना सह शाखा कार्यालय (डीसीबीओ) किंवा डीसीबीओ उपलब्ध नसलेल्या ईएसआयसीच्या क्षेत्रीय कार्यालयातून मिळवू शकतात.

तपासणी किंवारुग्णालयात दाखल होणे आवश्यक असल्यास, ईएसआय प्रविष्ट रूग्णालय इ.एस.आय. मान्यताप्राप्त प्राधिकरणाकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे 24 तासांच्या आत परवानगी घेईल आणि लाभार्थ्यांना कॅशलेस उपचार देईल. ईएसआयसी मुख्यालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची प्रत www.esic.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

M.Chopade/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1699136) Visitor Counter : 197