गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

जल जीवन अभियान-शहरी योजना देशातील सर्व शहरांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने अंमलबजावणीची आखणी

Posted On: 17 FEB 2021 7:48PM by PIB Mumbai

 

देशातल्या सर्व शहरांमधील घरांपर्यंत नळाने पाणीपुरवठा करणे शक्य होईल, अशा रीतीने जल जीवन अभियाना (शहरी) च्या (JJM-U) अंमलबजावणीची आखणी करण्यात आली आहे, अशी माहिती गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी दिली.

या अभियानामुळे देशातल्या शहरांमध्ये, जलसुरक्षेबाबत सकारात्मक स्पर्धा निर्माण तसेच, जलसंवर्धनाबाबत अधिक जागृती आणि संवेदनशीलता निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.

पेयजल सर्वेक्षण ही योजना आग्रा, बदलापूर, भुवनेश्वर, चुरू, कोचि, मदुराई, पटियाला, रोहतक, सूरत आणि तुमकुर या दहा शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली.

देशातल्या सर्व 4,378 अधिसूचित शहरांमधल्या सर्व घरांमध्ये नळाने पाणीपुरवठा करण्याचे जल जीवन अभियानाचे उद्दिष्ट असून, त्या दृष्टीने ही योजना राबवली जाणार आहे. त्यासोबतच, अमृत योजनेअंतर्गतच्या 500 शहरांमध्ये सांडपाणी/मलनिःसारण  व्यवस्थापन करून या शहरांना, जल-सुरक्षित बनवण्यावरही जलजीवन मिशनअंतर्गत भर दिला जाणार आहे. नागरी क्षेत्रात आज 2.68 कोटी घरांमध्ये नळाने पाणीपुरवठा सुविधा नाही. आणि 500 अमृत शहरांमध्ये 2.64  कोटी घरांसाठी  सांडपाणी व्यवस्था/मलनिःसारण सुविधा नाही. या सर्व सुविधा जलजीवन मिशनअंतर्गत दिल्या जाणार आहेत. या संपूर्ण अभियानासाठी 2,87,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यात अमृत अभियानाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 10,000 कोटी रुपयांचाही समावेश आहे.

***

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1698821) Visitor Counter : 177


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil