मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

एव्हीयन फ्लूचा कुक्कुट उद्योगावरचा परिणाम

Posted On: 12 FEB 2021 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2021

 

बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू आणि त्यांना नष्ट करण्यामुळे तसेच  बर्ड फ्लू पसरण्याच्या भीतीमुळे कुक्कुट उत्पादनाचे सेवन घटल्याने, अंडी आणि मांसाची किंमत कमी झाल्याने कुक्कुट उद्योगाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती या उद्योगाकडून देण्यात आली आहे.आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार  बर्ड फ्लू मुळे राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी 4,49,271 पक्षी नष्ट केले आहेत.

14 राज्यात,कोंबड्या आणि जंगली पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला. यामध्ये केरळ, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली आणि जम्मू काश्मीरचा समावेश आहे.  हरियाणा, महाराष्ट्र, पंजाब आणि केरळ या राज्यांमध्ये याचा मोठा प्रादुर्भाव झाला असून त्याचा तपशील परिशिष्टात देण्यात आला आहे.

Status of States affected badly due to bird flu (data as on 09.02.2021)

S.No.

State

Number of districts affected

Poultry died

Number of poultry birds culled

1.

Maharashtra

22

41,504

1,09,426

2.

Haryana

2

2,10,000

1,64,000

3.

Punjab

1

49,936

84,505

4.

Kerala

2

25,864

58,335

बर्ड फ्लू सह इतर पशु रोग नियंत्रणासाठी विभागाने, पशु रोग नियंत्रणासाठी राज्यांना मदतीअंतर्गत वित्तीय सहाय्य पुरवत राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रयत्नांना सहकार्य केले आहे. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी, नियंत्रणात आणण्यासाठीच्या कृती आराखड्या नुसार नष्ट करण्यात आलेल्या पक्षी आणि अंड्यांसाठी कुक्कुट पालक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. केंद्रीय  मत्स्योद्योग,पशुपालन आणि दुग्ध राज्य मंत्री डॉ संजीव कुमार बल्यान यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1697533) Visitor Counter : 166


Read this release in: Tamil , English , Punjabi