कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

कुशल कामगारांच्या प्रशिक्षणाबाबत जपानबरोबर सामंजस्य करार

Posted On: 12 FEB 2021 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2021

केंद्र सरकार आणि जपान सरकारने जानेवारी,  2021 मध्ये “विशिष्ट कुशल कामगार” संबंधित यंत्रणेचे योग्य संचालन करण्यासाठी भागीदारीच्या मूलभूत चौकटीनुसार सहकार्य करारावर (एमओसी) स्वाक्षरी केली. या मंत्रालयाच्या अंतर्गत चौदा क्षेत्रातील कुशल भारतीय कामगार उदा. सुश्रुषा सेवा, इमारत स्वच्छता; साहित्य प्रक्रिया उद्योग; औद्योगिक यंत्रणा उत्पादन उद्योग; विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक माहितीशी संबंधित उद्योग; बांधकाम, जहाज बांधणी आणि जहाज-संबंधित उद्योग; वाहन देखभाल; विमान वाहतूक, लॉजिंग,  शेती; मत्स्योद्योग, अन्न आणि शीतपेय उत्पादन उद्योग आणि अन्न सेवा उद्योग  यांची जपानमध्ये कुशल भारतीय कामगारांसाठी नोकरीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी निवड केली आहे.

तांत्रिक इंटर्न प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत (जपान सरकार) भारतातून जपानमध्ये उमेदवारांना आमंत्रित करत  एमएसडीई आणि जपानच्या  न्याय मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्रालय (जपान सरकार) यांनी ऑक्टोबर, 2017 मध्ये सहकार्य करारावर (एमओसी) वर स्वाक्षरी केली. कौशल्य विकास क्षेत्रात भारत आणि जपान यांच्यात द्विपक्षीय सहकार्यात लक्षणीय वाढ करण्याच्या उद्देशाने या करारावर  स्वाक्षरी करण्यात आली.

कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री राज कुमार सिंह यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1697496) अभ्यागत कक्ष : 217
Read this releasein: English , Urdu , Punjabi