ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
केंद्रीय अन्नधान्य गोदामांतील साठवणूकीसाठी आवश्यक क्षमता
Posted On:
12 FEB 2021 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2021
दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत एकूण धान्य साठा (गहू + तांदूळ ) हा 529.29 लाख मेट्रिक टन इतका असून भारतीय खाद्य महामंडळ(एफसीआय) आणि राज्यस्तरीय संस्था (स्वतः च्या मालकीच्या आणि भाड्याने घेतलेल्या) यांची साठवणूक क्षमता 819.19 लाख मेट्रिक टन इतकी आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय धान्य गोदामांत साठवणूक करण्याची पुरेशी क्षमता आहे.
मागील पाच वर्षांत आणि चालू वर्षात देशातील तांदूळ आणि गहू यांचे एकूण उत्पादन खालील प्रमाणे आहे:
आकडेवारी मेट्रिक टननुसार
|
Kharif Marketing Season (KMS)/ Rabi Marketing Season (RMS)
|
Wheat
|
Rice
|
|
2015-16
|
865.26
|
1044.07
|
|
2016-17
|
922.88
|
1097.00
|
|
2017-18
|
985.12
|
1115.20
|
|
2018-19
|
971.10
|
1164.20
|
|
2019-20
|
1035.96
|
1184.25
|
भारतीय अन्नधान्य महामंडळाने धान्यसाठा दीर्घ कालावधीसाठी वैज्ञानिक पध्दतीने साठविलेला आणि संरक्षित केलेला असतो.या साठ्यापैकी काही धान्य चक्रीवादळ/पूरअशा नैसर्गिक आपत्ती किंवा वाहतूक करताना कमी होतो. साठवण्याच्या जागेची गैरसोय किंवा हाताळण्याची सुविधा यामुळे कोणतेही थेट नुकसान होत नाही.
गेल्या पाच वर्षांत एफसीआय मधे खराब झालेल्या धान्याची आकडेवारी खालील प्रमाणे.
|
Year
|
Damage Accrual in FCI (In Lakh tonnes)
|
% Damaged foodgrain against offtake quantity
|
|
2015-16
|
0.03
|
0.01
|
|
2016-17
|
0.09
|
0.02
|
|
2017-18
|
0.027
|
0.006
|
|
2018-19
|
0.05
|
0.01
|
|
2019-20
|
0.02
|
0.004
|
ही माहिती केंद्रीय ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री श्री. दानवे रावसाहेब दादाराव यांनी राज्यसभेत एका लिखित उत्तरात दिली.
M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697486)
अभ्यागत कक्ष : 153