गृह मंत्रालय
चामोली जिल्ह्यात 7 फेब्रुवारीला हिमकडा कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेसंदर्भातल्या मदत कार्याचा केंद्रीय गृह सचिवानी घेतला आढावा
Posted On:
11 FEB 2021 9:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2021
धौलीगंगा नदीवरच्या तपोवन इथे राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाच्या जलविद्युत प्रकल्प स्थळी सुरु असलेल्या मदत आणि बचाव कार्याचा केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. उत्तराखंडमध्ये चामोली जिल्ह्यात ऋषीगंगा नदीच्या अपर पाणलोट क्षेत्रात 7 फेब्रुवारीला हिमकडा कोसळल्याने इथे हानी झाली असून केंद्रीय एजन्सी आणि उत्तराखंडच्या सरकारी एजन्सी मदतकार्य करत आहेत.
पाण्याच्या प्रवाहात आलेला तात्पुरता अडथळा दूर करण्यासाठीच्या आवश्यक कार्याचा केंद्रीय गृह सचिवांनी आढावा घेतला. संरक्षण आणि संशोधन संस्थेच्या सचिवांनी, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि केंद्र आणि राज्य सरकारी एजन्सीच्या समन्वयाने योग्य त्या उपाययोजना हाती घेण्यासाठी तज्ञांची नियुक्ती करावी असे सांगण्यात आले आहे. राज्य सरकारला आवश्यकता भासेल तिथे केंद्रीय एजन्सीच्या मदतीचे आणि सहाय्याचे आश्वासन केंद्रीय गृह सचिवानी यावेळी दिले.
उर्जा सचिव, आयटीबीपीचे महासंचालक, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष, एनटीपीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि केंद्रीय एजन्सीमधले वैज्ञानिक,केंद्रीय गृह मंत्रालयातले अधिकारी बैठकीला उपस्थित होते. उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि संबंधित अधिकारी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे यात सहभागी झाले.
M.Chopade/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697466)
Visitor Counter : 109