विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

दुसऱ्या टप्‍प्यात विज्ञान ज्योती कार्यक्रमाची 100 जिल्ह्यात व्याप्ती

Posted On: 12 FEB 2021 1:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2021

 

विज्ञान क्षेत्रातल्या महिला आणि मुली आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून 11 फेब्रुवारीला विज्ञान ज्योती कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला. विज्ञानात रुची वाढवण्यासाठी मुलीना प्रोत्साहन आणि एसटीईएम अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या मध्ये कारकीर्द घडवण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या  या कार्यक्रमाची व्याप्ती आणखी 50 जिल्ह्यात वाढवली जाणार आहे, सध्या 50 जिल्ह्यात हा कार्यक्रम आधीच राबवला जात आहे. एसटीईएम च्या विशिष्ट क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व अल्प असल्याची दखल घेऊन हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

गेल्या एक वर्षातला अनुभव लक्षात घेऊन हा कार्यक्रम अधिक समृद्ध होत देशाच्या जास्तीतजास्त जिल्ह्यात पोहोचेल आणि सर्वोच विज्ञान संस्थात महिलांची संख्या वाढण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा यांनी व्यक्त केली.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात   पुरुषांच्या बरोबरीने महिलांची संख्याही राहावी यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग महिला केन्द्री अनेक उपक्रम राबवत आहे. विज्ञानज्योती या कार्यक्रमाबरोबरच हा विभाग महिला वैज्ञानिक योजना यासारखे आणखीही महिला केन्द्री उपक्रम राबवत आहे. याशिवाय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने, महिला विद्यापीठात कृत्रिम बुद्धीमत्ता प्रयोगशाळा उभारल्या आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता नवोन्मेशाला चालना देण्याचा आणि भविष्यात कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित कुशल मनुष्यबळ तयार करण्याचा यामागचा उद्देश आहे.  

अधिक माहितीसाठी क्लिक करा

 

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1697342) Visitor Counter : 205


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali