इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
विज्ञान क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यासाठी मायजीओव्हीसोबत महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून ऑनलाईन मोहीमेचा प्रारंभ
प्रविष्टि तिथि:
11 FEB 2021 10:36PM by PIB Mumbai
स्टेम(एसटीईएम) अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि गणित या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी, तसेच या क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्याची आणि राष्ट्रउभारणीत योगदान देण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयाने शिक्षण मंत्रालय आणि माय जीओव्ही, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्याने आज विज्ञान क्षेत्रातील महिला आणि युवतींच्या आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने एक ऑनलाईन मोहीम सुरू केली. गणित आणि विज्ञान या विषयात देशभरात ज्या मुलींनी उत्तम कामगिरी केली आहे त्यांचा सन्मान या मोहिमेद्वारे करण्यात येत आहे आणि भावी काळात आपल्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्यासाठी या स्टेमस्टार्सना प्रोत्साहन देण्यात येत आहे. “ शालेय विद्यार्थ्यांमधील कल्पना आणि नवोन्मेषाच्या सामर्थ्याला बळ देण्यामुळे आपल्या नवोन्मेषाच्या कक्षा रुंदावतील” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर ही मोहीम आधारित आहे. या मोहिमेचा भाग म्हणून नागरिक एखाद्या युवा स्टेमस्टारचे त्यांची राज्ये/ जिल्हे येथून त्यांच्या वैयक्तिक कार्डच्या माध्यमातून अभिनंदन करू शकतात आणि आपल्या देशाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या विषयांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करू शकतात. मायजीओव्हीवर अशा 700 पेक्षा जास्त स्टेमस्टार्सची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यासाठी https://mygov.in/stem-star ला भेट द्या आणि आपल्या भावी सुपरस्टार्सचे कौतुक #WomenInScience सोबत आपल्या वैयक्तिक कार्डवर समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करा.
***
S.Tupe/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1697257)
आगंतुक पटल : 219