निती आयोग

निती आयोगाचे अटल इनोव्हेशन मिशन आणि राष्ट्रकुल वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने  भारत-ऑस्ट्रेलिया चक्रीय अर्थव्यवस्था (आय-एसीई) हॅकेथॉन, 2021 सुरु

Posted On: 11 FEB 2021 6:12PM by PIB Mumbai

 

ऑस्ट्रेलिया आणि भारतातील प्रतिभावान विद्यार्थी आणि स्टार्ट-अप्सना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे सामायिक समस्या  सोडवण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने एआयएम आणि ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेने (सीएसआयआरओ) भारत-ऑस्ट्रेलिया चक्रीय अर्थव्यवस्था (आय-एसीई) हॅकेथॉन 2021 सुरू केली.

पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांच्यात 4 जून  2020 रोजी झालेल्या आभासी द्विपक्षीय शिखर परिषदेत आय-एसीई संयुक्त हॅकेथॉनची संकल्पना मांडण्यात आली ज्यात दोन्ही देश चक्रीय अर्थव्यवस्थेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी वचनबद्ध आहेत.

दोन्ही देशांकडून प्राप्त झालेल्या 1000 हून अधिक अर्जाची कठोर तपासणी प्रक्रिया झाली, त्यानंतर अव्वल 80 अर्जांची निवड द्विपक्षीय  हॅकेथॉनसाठी केली गेली, ज्यामध्ये दोन्ही राष्ट्रांचे विद्यार्थी आणि स्टार्टअप्स प्राधान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या अभिनव पद्धतींवर एकत्र काम करतील. उदा. पॅकेजिंग कचरा कमी करणारे  पॅकेजिंगमधील नावीन्यपूर्ण संशोधन, नासाडी टाळणारे अन्नपुरवठा साखळीतील नवसंशोधन, प्लास्टिक कचरा कमी करण्याच्या संधी निर्माण करणे आणि महत्वपूर्ण ऊर्जा धातू आणि ई-कचरा यांचा पुनर्वापर करणे.

8 ते 11 फेब्रुवारी 2021 दरम्यान, निवड झालेल्या संघानी प्रासंगिक, नाविन्यपूर्ण, अंमलबजावणी योग्य, प्रभावी आणि जागतिक बाजारपेठेत व्यावसायीकरण करता येतील अशा कल्पक उपायांवर काम केले. .

उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असलेले सीएसआयआरओचे संचालक निक पेजेट म्हणाले या हॅकाथॉनची संकल्पना चक्रीय अर्थव्यवस्थाअसून ती, ऑस्ट्रेलियासाठी भारताएवढीच  महत्त्वाची आहे.

चक्रीय अर्थव्यवस्था' मॉडेल, जे केवळ कचरा व्यवस्थापन करत नाही तर  पुनर्वापर, पुनर्प्रक्रिया आणि जबाबदार उत्पादन जे  नवीन उद्योग आणि रोजगारांच्या विकासात सहाय्य करू शकते, उत्सर्जन कमी करते आणि नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर वाढवते."असे ते म्हणाले.

हॅकेथॉनच्या आभासी उद्घाटनाच्या मुख्य भाषणात  अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक आणि अतिरिक्त सचिव आर. रामानन म्हणाले, सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण कल्पनांची विविधता आणि त्यांचे बाहेरच्या देशांमधून येणारे अर्ज ही काळाची गरज आहे.

 

अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) विषयी

अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम), नीती आयोग, हा देशात नावीन्यपूर्ण संशोधन आणि उद्योजकता संस्कृतीला चालना देण्यासाठी केंद्र  सरकारचा प्रमुख उपक्रम आहे.

संपर्क: india.ace[at]gov[dot]in  (www.aim.gov.in )

राष्ट्रकुल वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संघटना (सीएसआयआरओ) विषयी

राष्ट्रकुल वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संघटना (सीएसआयआरओ) ही ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय विज्ञान संस्था आणि नवसंशोधन  उत्प्रेरक आहे, जे नाविन्यपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे सर्वात मोठी आव्हाने सोडवत आहे.

संपर्क: I-ACE@csiro.au  (www.csiro.au )

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1697158) Visitor Counter : 221


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil