कोळसा मंत्रालय
राष्ट्रीय कोळसा निर्देशांक
Posted On:
11 FEB 2021 1:26PM by PIB Mumbai
कोळसा मंत्रालयाने महसूल विभागणीच्या आधारावर कोळसा खाणींचा व्यावसायिक लिलाव सुरू केला आहे. कोळशाच्या बाजारभावांवर आधारित महसूल वाटा ठरवण्यासाठी एक राष्ट्रीय कोळसा निर्देशांक (एनसीआय) तयार केला आहे. एनसीआय हा किंमत निर्देशांक आहे जो निश्चित आधार वर्षाच्या अनुषंगाने विशिष्ट महिन्यात कोळशाच्या किंमतीच्या पातळीतील बदल दाखवेल. एनसीआयसाठी आधार वर्ष आर्थिक वर्ष 2017-18 आहे. एनसीआय संकलित करण्यासाठी सध्या अस्तित्त्वात असलेल्या कोळशाच्या सर्व विक्री माध्यमातील कोळशाच्या किंमती विचारात घेतल्या जातात. लिलाव केलेल्या खाण क्षेत्रातून उत्पादित कोळशाचे प्रति टन उत्पन्न निश्चित केलेल्या सूत्राद्वारे एनसीआयचा वापर करून ठरवले जाईल.
4 जून 2020 रोजी एनसीआय सुरू करण्यात आली आहे आणि ती कोळसा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एनसीआयमध्ये पाच उप-निर्देशांकांच्या संचाचा समावेश आहे-: नॉन-कोकिंग कोलसाठी तीन आणि कोकिंग कोलसाठी दोन. नॉन-कोकिंग कोलसाठी तीन उप-निर्देशांक एकत्रित केले आहेत आणि कोकिंग कोळसासाठी दोन उप-निर्देशांक एकत्रित केले आहेत. अशा प्रकारे, नॉन-कोकिंग आणि कोकिंग कोलसाठी निर्देशांक वेगळे आहेत. खाणीशी संबंधित कोळशाच्या श्रेणीनुसार महसूल वाटपासाठी योग्य उप-निर्देशांक वापरला जातो.
केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697058)
Visitor Counter : 215