कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्रसिंग यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि जम्मू काश्मीर मधील सेवानिवृत्त होणाऱ्या राज्यसभा खासदारांसाठी नवी दिल्ली येथील निवासस्थानी निरोप समारंभ आयोजित केला.

Posted On: 10 FEB 2021 11:33PM by PIB Mumbai

 

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्रसिंग यांनी आज राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि जम्मू काश्मीर मधील सेवानिवृत्त होणाऱ्या राज्यसभा खासदारांसाठी नवी दिल्ली येथिल  त्यांच्या निवासस्थानी निरोप समारंभ आयोजित केला होता.

सेवानिवृत्त होत असलेले राज्यसभेचे सदस्य शमशेरसिंग मनहास, मीर मोहम्मद फैज, ज्येष्ठ राज्यसभा सदस्य आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, एमओएस जम्मू-कश्मीर गृह प्रभारी राज्यमंत्री जी. किशन रेड्डी आणि जम्मूचे लोकसभा सदस्य जुगल किशोर शर्मा यावेळी उपस्थित होते.

संसदेच्या सध्याच्या अधिवेशनात जम्मू-काश्मीरमधील राज्यसभेच्या सर्व सदस्यांची सहा वर्षांची मुदत संपुष्टात येत असून विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर तेथे विधानसभा स्थापित होईपर्यंत  जम्मू-काश्मीरमधून राज्यसभेचे प्रतिनिधित्व होणार नाही हे नमूद करणे महत्वाचे आहे .

संसदेशी 1980 पासून असलेला दीर्घकाळचा संबंध आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून असलेले त्यांचे अनुभव गुलाम नबी आझाद यांनी यावेळी सांगितले.

शमशेरसिंग मनहास यांनी त्यांच्या राज्यसभेच्या सहा वर्षांच्या कार्यकाळातील अनुभवाविषयी सांगितले तर मीर फैयाज यांनी जम्मू-काश्मीरमधील सेवानिवृत्त खासदारांच्या सन्मानार्थ अशा प्रकारे एका अनौपचारिक खासगी बैठकीच्या आयोजन करून  डॉ जितेंद्रसिंग यांनी दाखवलेल्या  जिव्हाळ्याचे कौतुक केले.

आझाद यांनी ओदिशामध्ये  कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम करताना ,राज्यातील जनतेसह सर्वच राजकीय पक्षांकडून आदरभाव मिळविला होता असे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले . आझाद हे दक्षिणेकडील राज्यांचा कॉंग्रेस प्रभारी असतानाच्या दिवसांच्या आठवणींना जी. किशन रेड्डी यांनी उजाळा दिला.

 

Jaydevi PS/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1697043) Visitor Counter : 101


Read this release in: English , Urdu , Hindi