भारतीय स्पर्धा आयोग

भारताच्या प्रतिस्पर्धा आयोगाची बीओआय अक्सा इन्वेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बीओआय ट्रस्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे बँक ऑफ इंडियाच्या संपादनाला मंजुरी

Posted On: 10 FEB 2021 11:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2021


भारताच्या प्रतिस्पर्धा आयोगाने आज बीओआय अक्सा इन्वेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड (“BOIAXA IM”) आणि बीओआय ट्रस्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (“BOIAXA TS”) द्वारे बँक ऑफ इंडियाच्या (“BOI”) संपादनाला कंपनी कायदा, 2020 कलम 31(1) अंतर्गत  मंजुरी दिली.

या प्रस्तावित एकीकरणात BOI, BOIAXA IM आणि BOIAXA TS चे 49% भाग भांडवल संपादित करतील. परिणामतः BOI कडे BOI AXA IM & BOI AXA TSची एकल मालकी येईल आणि BOI AXA Mutual Fund चे एकल प्रायोजकत्व येईल. या प्रस्तावित एकीकरणापश्चात BOI बँकिंग व्यवसायातच राहील आणि म्युच्युअल फंड तसेच इतर उत्पादनांचे लक्षित व्यक्तीना वितरण करेल.

BOI  ही सार्वजनिक क्षेत्रातली बँक असून तिची स्थापना बँकिंग कंपनी कायदा (उपक्रमांचे संपादन आणि हस्तांतरण) कायदा, 1970 अंतर्गत झाली आहे.   BOI AXA IM ही एक कंपनी कायदा, 1956 अंतर्गत स्थापन झालेली खाजगी कंपनी आहे. ही BOI AXA Mutual Fund या कंपनीची मालमत्ता व्यवस्थापक कंपनी म्हणून काम करते.

BOI AXA TS ही देखील एक खाजगी कंपनी असून, तिची स्थापना कंपनी कायदा, 1956 अंतर्गत झाली आहे.  ही कंपनी BOI AXA म्युच्युअल फंड्सना विश्वस्त सेवा पुरवते.

यासंबंधी भारताच्या प्रतिस्पर्धा आयोगाचा विस्तृत अहवाल लवकरच जारी करण्यात येईल.

 

* * *

S.Tupe/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1696955) Visitor Counter : 116


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil