सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

व्हीसीएफ-एससी अंतर्गत आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इनक्युबेशन मिशन

Posted On: 10 FEB 2021 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2021


अनुसूचित जातीतील विद्यार्थी आणि दिव्यांग तरूणांमध्ये उद्योजकता आणि अभिनवतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने 30 सप्टेंबर 2020 रोजी अनुसूचित जातींसाठी व्हेंचर कॅपिटल फंड (व्हीसीएफ-एससी) अंतर्गत आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इनक्युबेशन मिशन (एएसआयआयएम) सुरू केले आहे.

टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर्स बरोबर नोंदणी केलेल्या अनुसूचित जातीच्या मालकीच्या कंपन्या /उद्योजक 3 वर्षाच्या कालावधीसाठी जास्तीत जास्त 30 लाख रुपयांचे म्हणजे दर वर्षी 10 लाख रुपये भांडवल मिळवण्यास पात्र आहेत.

पात्र उमेदवारांना इक्विटी फंडिंग म्हणून 3 वर्षाच्या कालावधीसाठी वर्षाकाठी 10 लाख रुपये असे एकूण 30  लाख रुपये आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1696897) Visitor Counter : 207


Read this release in: English , Urdu