पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर

Posted On: 10 FEB 2021 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2021

 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरामध्ये दररोज चढउतार होतात. भारतीय बाजारपेठेतील गेल्या पाच वर्षातील कच्च्या तेलाचे सरासरी दर आणि कच्च्या तेलाचे प्रमाण खालीलप्रमाणे..

Financial Year

Indian Basket of Crude Oil ($/bbl)

Import of crude oil (‘000 Metric Tonnes)

2015-16

46.17

202850

2016-17

47.56

213932

2017-18

56.43

220433

2018-19

69.88

226498

2019-20

60.47

226955

भारतीय बाजारात शुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया केलेले कच्च्या तेलाचे  सोअर ग्रेड (ओमान आणि दुबई सरासरी)  आणि स्वीट ग्रेड (ब्रेंट डेटेड) यांचा समावेश आहे.

अनुक्रमे 26.06.2010 आणि 19.10.2014 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बाजारभावानुसार ठरलेल्या आहेत. तेव्हापासून, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या (ओएमसीज) आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या किंमती आणि बाजाराच्या अन्य परिस्थितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर योग्य निर्णय घेतात. आंतरराष्ट्रीय दर तसेच रुपया आणि डॉलरच्या विनिमय दरानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवतात आणि कमीही करतात.

सार्वजनिक तेल कंपन्यांनी 16 जून ,2017 पासून संपूर्ण देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्री  किंमतीचे (आरएसपी) दररोज परीक्षण कार्यान्वित केले आहे.ग्राहकांना लाभ देण्याच्या दृष्टीने, किंमतीत पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी दररोज किंमती ठरविण्याची सुरवात केली.पेट्रोल/ डिझेलच्या किरकोळ विक्री दराचा तपशील पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्ष (पीपीएसी) अर्थात  www.ppac.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

गेल्या पाच वर्षातील दिल्ली बाजारपेठेतील पेट्रोल आणि डिझेलची वार्षिक सरासरी किंमत (आयओसीएलनुसार) खालीलप्रमाणे:

Financial Year

Petrol

Diesel

2015-16

61.59

47.01

2016-17

64.61

53.24

2017-18

69.20

58.78

2018-19

75.37

68.22

2019-20

72.69

65.78

2020-21 (till 2nd February 2021)

79.12

72.31

दिल्लीतील पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ विक्री दर (आयओसीएलनुसार).

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक व वायू मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1696748) Visitor Counter : 124


Read this release in: English , Urdu , Bengali , Manipuri