रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्त्यावरील अपघात ही परिस्थिती चिंताजनक : नितीन गडकरी
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे केले आवाहन
Posted On:
09 FEB 2021 10:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2021
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांनी होणाऱ्या म्रुत्यूंच्या प्रमाणात 2025 सालापर्यंत 50%घट होणे सुनिश्चित करण्यासाठी हितसंबंधितांनी सर्वसमावेशक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगत ते म्हणाले की रस्ते अपघातात जगात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत,अमेरिका आणि चीनच्याही पुढे. आंतरराष्ट्रीय रस्ते परीसंघाच्या भारत विभागाच्या वतीने झालेल्या ‘भारतातील रस्ते सुरक्षा आव्हाने आणि कृती आराखडा’ या विषयावर सुरू असलेल्या वेबिनार मालिकेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. देशात दरवर्षी 1.5 लाख लोक मृत्यूमुखी पडतात आणि 4.5 लाख लोक रस्ते अपघातात जखमी होतात.हे प्रमाण दरदिवशी 415 मृत्यू इतके आहे. या अपघातांमुळे देशाच्या राष्ट्रीय जीडीपीच्या 3.14% सामाजिक आर्थिक नुकसान होते आणि मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 70%लोक 18 ते 45 या वयोगटातील असतात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
त्यांच्या मंत्रालयाने केलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करत गडकरी म्हणाले की, सुधारीत अभियांत्रिकी, शिक्षण, अंमलबजावणी ,आपत्कालीन सेवा या काही मंत्रालय उपाय योजना या प्रश्नांच्या मुकाबल्यासाठी घेतल्या आहेत. ते म्हणाले की मंत्रालयाने महामार्गावरील जाळ्यातील 5000 अपघातप्रवण ठिकाणे शोधून काढली आहेत आणि 40,000 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीच्या रस्त्यांचे सुरक्षिततेसाठी सर्वेक्षण केले जात आहे.
रस्त्यावरील सुरक्षिततेच्या जागृती साठी सध्या भारतभर रस्ता सुरक्षा मास पाळला जात आहे. रस्ता सुरक्षिततेच्या सर्व बाबींचा समावेश करणाऱ्या 12 वेबिनार वर्षभर आयोजित करण्यात येणार आहेत,असेही ते म्हणाले.
G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696646)
Visitor Counter : 350