सांस्कृतिक मंत्रालय
भारताचा पारंपरिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना
Posted On:
08 FEB 2021 8:16PM by PIB Mumbai
संगीत नाटक अकादमी (एसएनए), सांस्कृतिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (सीसीआरटी), कलाक्षेत्र फाउंडेशन (केएफ), इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स (आयजीएनसीए), नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी), साहित्य अकादमी (एसए) आणि ललित कला अकादमी (एलकेए) यासारख्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संस्था भारताचा पारंपारिक सांस्कृतिक वारसा जपण्याचे आणि त्याला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत.
सांस्कृतिक मंत्रालयाने “भारतीय अमूर्त वारसा आणि विविध सांस्कृतिक परंपरा संवर्धन योजना” या नावाने एक योजना तयार केली आहे जेणेकरून विविध संस्था, गट, व्यक्ती, बिगर सांस्कृतिक संस्था, बिगर -सरकारी संस्था, संशोधक आणि विद्वान भारतातील समृद्ध अमूर्त सांस्कृतिक वारसा बळकट करण्यासाठी, त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम /प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकतील.
सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) प्रह्लादसिंग पटेल यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696300)
Visitor Counter : 194