केंद्रीय लोकसेवा आयोग

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (असिस्टंट कमांडंट) लेखी परीक्षा  2020 चा निकाल

Posted On: 08 FEB 2021 7:42PM by PIB Mumbai

 

20 डिसेंबर 2020 रोजीच्या लेखी परीक्षेत पात्र घोषित झालेल्या उमेदवारांनी तपशीलवार अर्ज (डीएएफ) ऑनलाईन भरण्यापूर्वी संकेतस्थळाच्या संबंधित पृष्ठावर पाठपुरावा केलेल्या कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करण्यासह त्यांची पात्रता, आरक्षणाचा दावा इत्यादी तपशिलासह आयोगाच्या  http://www.upsc.gov.in  या संकेतस्थळावर स्वत: ची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन तपशीलवार अर्ज आयोगाच्या संकेतस्थळावर 12.02.2021 पासून 25.02.2021 च्या संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. तपशीलवार अर्ज भरण्यासाठी आणि तो आयोगाला ऑनलाईन सादर करण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण सूचनाही संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ज्या उमेदवारांनी आपले तपशीलवार अर्ज (डीएएफ) सादर केले आहेत त्यांना नोडल प्राधिकरणाद्वारे कॉल लेटर पाठविले जाईल अर्थात पीएसटी/पीईटी/एमएसटीला हजर राहण्यासाठी आयटीबीपी. उमेदवारांना पीएसटी/पीईटी/एमएसटी येथे हजर राहण्यासाठी नियुक्त केलेल्या केंद्रांवर कॉल लेटर सोबत आधार कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र यासारखे फोटो ओळखपत्र सोबत बाळगावे लागेल.

पत्राद्वारे किंवा फॅक्सद्वारे संपर्क सुलभ करण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या पत्त्यात काही बदल झाला असल्यास मुख्यालय, महासंचालक, इंडो तिबेट सीमा पोलिस, ब्लॉक क्र. 2, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली -110 003 किंवा दूरध्वनी क्रमांक 011-24369482 / 011-24369483 आणि ई-मेल आयडी comdtrect@itbp.gov.in   किंवा युपीएससीकडे संपर्क साधून माहिती देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

कृपया निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा:

***

S.Thakur/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1696280) Visitor Counter : 152


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil