गृह मंत्रालय
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यासाठी केंद्रीय सचिवांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती (एनसीएमसी)ची आढावा बैठक
Posted On:
07 FEB 2021 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2021
हिमकडा कोसळल्यामुळे उत्तराखंड मध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यासठी केंद्रीय सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) बैठक झाली. हिमकडा नदीत कोसळल्यामुळे ऋषीगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली ज्यामुळे 13.2 मेगावॅटचा ऋषी गंगा लघु जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. अलकनंदा नदीची उपनदी असलेल्या धौलीगंगा नदीवरील तपोवन येथील एनटीपीसीच्या जलवाहिनीलाही या पुराचा फटका बसला आहे.
केंद्रीय सचिवांनी संबंधित संस्थांना राज्य सरकारसोबत समन्वयाने कार्य करण्याचे आणि राज्य प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे निर्देश दिले. या पुरात वाहून गेलेल्या सर्वांचा शोध घेण्याची आवश्यकता असून बोगद्यात अडकलेल्यांना सोडविण्यासाठी लवकरात लवकर बचावकार्य सुरु करण्याची गरज व्यक्त केली. बचावकार्य पूर्ण होईपर्यंत आणि परिस्थिती सामान्य होईपर्यंत देखरेख ठेवण्याचे त्यांनी निर्देश दिले.
उत्तराखंडच्या मुख्य सचिवांनी समितीला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तेथील सद्य परिस्थितीची आणि सुरु असलेल्या कारवाईची माहिती दिली.
केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) दिलेल्या माहितीनुसार, सध्या पुराचा कोणताही धोका नाही आणि पाण्याच्या पातळीत वाढ होणे थांबले आहे. शेजारच्या खेड्यांनाही धोका नाही.
आयटीबीपीने बोगद्यात अडकलेल्या सुमारे 12 जणांची सुटका केली असून बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
एनडीआरएफच्या 2 तुकड्या घटनास्थळी पोहोचत असून हिंदनहून अतिरिक्त 3 तुकड्या रवाना झाल्या असून त्या रात्री घटनास्थळी पोहोचतील. भारतीय हवाई दला(आयएएफ) च्या विमानात / हेलिकॉप्टरमध्ये नौदलाचे डायव्हर्स सज्ज आहेत.
पुढील दोन दिवस या भागात पावसाची शक्यता नसल्याचे आयएमडीने बैठकीत सांगितले.
* * *
S.Kane/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696016)
Visitor Counter : 264