पर्यटन मंत्रालय

असियान-भारत पर्यटनमंत्र्यांच्या 8व्या बैठकीत प्रल्हाद सिंग पटेल यांचा व्हर्चुअल सहभाग

Posted On: 05 FEB 2021 10:13PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी आज कंबोडियाचे पर्यटनमंत्री थाँग खॉन यांच्यासोबत असियान-भारत पर्यटनमंत्र्यांच्या 8 व्या  बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले. असियान पर्यटन मंत्र्यांच्या 24व्या बैठकीच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोविड-19 महामारीमुळे आसियान क्षेत्रात झालेल्या जीवित आणि लोकांच्या चरितार्थाच्या  हानीबद्दल उभय  मंत्र्यांनी या बैठकीत दुःख व्यक्त केले. या महामारीचा पर्यटन क्षेत्रावर झालेला परिणाम कमी करण्यासाठी सहकार्याने प्रयत्न करण्याच्या गरजेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

Image

पटेल यांनी असियान राष्ट्रांशी असलेल्या भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना अधोरेखित केले आणि  भारतातील बौद्ध धर्माशी सर्व स्थळांना भेट देण्याची पर्यटकांसाठी  सोय असलेल्या  बुद्धीस्ट सर्किटसाठी असियान एक प्रमुख बाजारपेठ असल्याचा आणि या सर्किटमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असल्याचा पुनरुच्चार केला. वैद्यकीय पर्यटन आणि निरोगी जीवनाचे महत्त्व वाढत असून  भारतातील अत्याधुनिक दर्जेदार  वैद्यकीय सुविधा, परवडण्याजोगे दर, कमी प्रतीक्षा कालावधी आणि सोप्या वैद्यकीय व्हिसा प्रक्रिया यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी प्रमुख पंसतीचे राष्ट्र म्हणून भारत उदयाला येत आहे, असे पटेल यांनी सांगितले.

Image

कोविड पश्चात पर्यटन व्यवहारांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पर्यटनमंत्रालयाने तयार केलेल्या आराखड्याची त्यांनी यावेळी माहिती दिली. साथी( आदरातिथ्य उद्योगाचे मूल्यमापन, जागरुकता आणि प्रशिक्षण प्रणाली) आणि देशभरात उत्तम प्रकारे प्रशिक्षित आणि व्यावसायिक पर्यटन सुविधा पुरवठादारांचे मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार केलेला अतुल्य भारत पर्यटन सुविधा(आयआयटीएफ) प्रमाणीकरण कार्यक्रम हा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम यांसारख्या उपक्रमांचा त्यात समावेश आहे.

प्रसारमाध्यमांसाठी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून या बैठकीची सांगता झाली. असियान आणि भारत यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत असियान-भारत पर्यटन सहकार्य आणखी वृद्धींगत करण्याबाबत या मंत्र्यांनी यावेळी सहमती व्यक्त केली.

****

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1695696) Visitor Counter : 171


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri