रेल्वे मंत्रालय

2021 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प हा भारतीय रेल्वेसाठी वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन


आत्तापर्यंतच्या सर्वाधिक भांडवली खर्चाच्या (2,15,058 कोटी रुपये) उपलब्धतेसह भारताला आत्मनिर्भर बनविण्यात भारतीय रेल्वे उत्प्रेरक ठरेल - पीयूष गोयल

Posted On: 04 FEB 2021 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2021


केंद्रीय रेल्वे, वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज 04.02.2021 रोजी आभासी परिषदेला संबोधित केले.

2021 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प हा भारतीय रेल्वेसाठी ऐतिहासिक असून यात भारतीय रेल्वेतील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर भर देण्यात आला आहे. भारतीय रेल्वेसाठी केलेली सर्वाधिक भांडवली खर्चाची तरतूद ही अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उत्प्रेरक ठरेल आणि भारतीय रेल्वेची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करेल असे अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी पीयूष गोयल यांनी सांगितले.

सन 2023 पर्यंत 100% विद्युतीकरण, 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे नेटवर्क, रेल्वेचे आधुनिकीकरण, तिकिट आरक्षण सुलभ करणे, ऑनलाइन मालवाहतूक सेवा यासारख्या व्यापक योजनांवर रेल्वे प्रगती करीत आहे. अशाप्रकारे भारतीय रेल्वे ‘फ्यूचर रेडी’ नेटवर्क बनण्याच्या मार्गावर आहे.

कोविड परिस्थितीचे अवलोकन केले जात असल्याने अन्य हितधारकांशी सल्लामसलत करून सामान्य रेल्वे सेवा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे एका प्रश्नाला उत्तर देताना पीयूष गोयल यांनी सांगितले.

समर्पित मालवाहतूक मार्गिकेसंदर्भात बोलताना पीयूष गोयल म्हणाले की मालमत्तेचे आधुनिकीकरण टप्प्याटप्प्याने करता येईल. भारतीय रेल्वेच्या व्यवस्थापन मंत्राबद्दल बोलताना गोयल म्हणाले की प्राधान्य, संसाधन वाटप व वेगवान कामगिरी निश्चित करणे हा भारतीय रेल्वेचा व्यवस्थापन मंत्र आहे. सध्या नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यापेक्षा प्रकल्प पूर्ण होण्यावर भर देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतीय रेल्वेसाठी यावर्षी 2,15,058 कोटी रुपये हे आत्तापर्यंतच्या सर्वात जास्त भांडवली खर्चाचे नियोजन असून त्यात 7,500 कोटी रुपये अंतर्गत संसाधनांमधून, 1,00,258 कोटी रुपये अतिरिक्त अर्थसंकल्पीय संसाधनांमधून आणि 1,07,100 कोटी रुपये सर्वसाधारण अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी दिले आहेत याची नोंद घ्यावी लागेल.
एकूण अर्थसंकल्पातील तरतूद 37,050 कोटी रुपये असून ती 2020-21 च्या अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा (53%) जास्त आहे.

* * *

S.Tupe/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1695281) Visitor Counter : 117