शिक्षण मंत्रालय

बौध्दिक कमतरता असणाऱ्या मुलांना मान्यता

Posted On: 04 FEB 2021 5:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2021


शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने वर्ग पहिली ते बारावीसाठी समग्रशिक्षा योजना सुरू केली आहे. यामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षण (Inclusive Education-IE) असा घटक आहे.  या अंतर्गत अशी विशेष गरजा असलेली मुले मुख्य प्रवाहात सामावली जाण्याच्या दृष्टीने त्यांना सर्वसाधारण शाळेत दाखल करता येते. समग्र शिक्षण घटकांमध्ये आरपीडब्ल्यूडी कायदा-2016 मध्ये व्याख्या केलेल्या 21 प्रकारच्या बौद्धिक अक्षमता असलेल्यांचा समावेश आहे, ज्यात बौद्धिक अक्षमता, डाऊन सिन्ड्रोम व वाढीचा वेग कमी असणे हेसुद्धा समाविष्ट आहे.

ही माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री, रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी राज्यसभेत आज एका लेखी उत्तरादरम्यान दिली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

* * *

S.Tupe/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1695185) Visitor Counter : 171


Read this release in: English , Urdu , Punjabi